नवीन नांदेड l अखंड मानवतेचे पुरस्कर्ते भारतीय जनता पक्षाचे अग्रदूत, भारतीय जनसंघाचे नेते, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती इंदिरा गांधी हायस्कूल व इंदिरा गांधी प्राथमिक शाळेच्या वतीने साजरी करण्यात आली.


पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ.वैशाली देशमुख मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ शिंदे यांनीही प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावळी ज्येष्ठ शिक्षक श्री एम. टी.कदम, प्राथमिकचे ज्येष्ठ शिक्षक कल्याणकर व सर्व शिक्षक बंधू, व शिक्षिका भगिनी, बालवाडीच्या कुलकर्णी , शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पडोळे यांनी केले




