उस्माननगर l 15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.30 वा. सुमारास उस्माननगर ते नांदेड रोडवरील उदासी बाबि चौक रस्त्यावर हायवा चालकाला ताब्यात घेऊन पाच ब्रास रेतीसह हयावा मुद्देमाल जप्त उस्माननगर पोलीसांनी पकडली.


ही गाडी चोरट्या पध्दतीची वाळू वाहतूक करत होती. प्रदीप शिवाजी राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हायवा क्रमांक एम.एच.46 बी.बी.9564 ची 15 ऑगस्ट रोजी रात्री तपासणी केली असतांना त्यामध्ये चोरट्या पध्दतीची वाळू भरलेली होती. 25 हजार रुपये किंमतीची 5 ब्रास वाळू आणि 25 लाखांची गाडी असा 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल उस्माननगर पोलीसांनी जप्त केला आहे.


उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस उपनिरिक्षक गजानन गाडेकर, पोलीस अंमलदार प्रदीप राठोड, तुकाराम जुने, प्रकाश पदेवाड, होमगार्ड भगवान केंद्रे, ओमकार पांचाळ यांनी ही कार्यवाही केली. या प्रकरणात येळी ता.लोहा येथील दिलीप व्यंकटी पवार (30) या व्यक्तीचे नाव आरोपी सदरात आहे.




