किनवट, परमेश्वर पेशवे। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वाळकी आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत येणाऱ्या इस्लापूर येथील अंगणवाडी व कोसमेट आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत येणाऱ्या कोसमेट भिशी उपकेंद्रांतर्गत येथे व इस्लापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरकर नगर या ठिकाणी दहाव्या जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. आरोग्यवर्धिनी केंद्राच्या योग शिक्षिका सौ.अनुराधा पेशवे यांनी योगा संदर्भात मार्गदर्शन करीत असताना योगाचे प्रकार किती आहेत व योगा कशा पद्धतीने कराव्यात याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.
त्यामध्ये सूर्यनमस्कार ,कपालभाती, भ्रमरी, प्राणायाम ,नाडी शुद्धी, ताडासन, गरुड आसन, वृक्षासन वज्रासन, पश्चिमोत्तानासन, यांच्यापासून आरोग्यास होणारे आरोग्यदायी फायदे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना व लाभार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. शरीरातील उत्पन्न होणाऱ्या व्याधी पासून मुक्तता त्याचबरोबर मनाची शांती लाभण्यासाठी एकाग्रता वाढण्यासाठी या विविध असणाचा फायदा होऊ शकतो तेव्हा प्रत्येकानी योगाला दिनचर्यामध्ये आणावे अशा पद्धतीचे मत योगशिक्षिका अनुराधा पेशवे यांनी व्यक्त केले योग शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किशन गायकवाड यांच्या मार्गदर्शनात खाली घेण्यात आलै.
सदरील कार्यक्रमास डॉक्टर एन व्ही सातोरे ,डॉक्टर अंकुश आव्हाड, डॉक्टर रत्नमाला जानगेवाड, आरोग्य सेविका एम पी गोपन वाड, एस आर झंपलवाड, स्वाती कोटमंगल, एस एन शेंद्रे, आरोग्य सेवक बी एल ताडेवाड, ए.पी .चव्हाण, अशा वर्कर सारिका डोंगरे , सुनीता पोतूलवाड श्यामा भंडारे ,कल्पना जंगिलवाड, अर्चना आशा वर्कर किनवट पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा अडबलवार ,शिक्षक पांडे ,फोले एस,जी. यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.