आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इस्लापूर शहरात विविध ठिकाणी योग दिन साजरा -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वाळकी आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत येणाऱ्या इस्लापूर येथील अंगणवाडी व कोसमेट आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत येणाऱ्या कोसमेट भिशी उपकेंद्रांतर्गत येथे व इस्लापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरकर नगर या ठिकाणी दहाव्या जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. आरोग्यवर्धिनी केंद्राच्या योग शिक्षिका सौ.अनुराधा पेशवे यांनी योगा संदर्भात मार्गदर्शन करीत असताना योगाचे प्रकार किती आहेत व योगा कशा पद्धतीने कराव्यात याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.
त्यामध्ये सूर्यनमस्कार ,कपालभाती, भ्रमरी, प्राणायाम ,नाडी शुद्धी, ताडासन, गरुड आसन, वृक्षासन वज्रासन, पश्चिमोत्तानासन, यांच्यापासून आरोग्यास होणारे आरोग्यदायी फायदे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना व लाभार्थ्यांना पट...
