नवीन नांदेड l छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पुर्व संध्येला सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक सिडको येथे युवा नेते ऊदयभाऊ देशमुख मित्र मंडळ यांच्या वतीने दिपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष मध्ये अनेक महिला भगिनी व युवक युवती यांच्या उपस्थितीत हा नयनरम्य वातावरणात साजरा करण्यात आला तर सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने सिडको हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा व जिजाऊ सृष्टी सिडको येथेही दिपोत्सव साजरा करण्यात आला.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवती रंगरंगोटी व लाईटिंग टाकुन सुशोभीकरण करण्यात आले तर रांगोळी वफुलाची सजावट करण्यात आली.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला.

यावेळी युवा नेते ऊदयभाऊ देशमुख ,संजय पाटील घोगरे,सतिश पाटील बसवदे,माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड,राजु लांडगे, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रमेश ठाकूर,पप्पू गायकवाड, कैलास हंबर्डे,दिपक भरकड,प्रितम लिबेंकर,निकीता शहापुरवाड , पुष्पा देशमुख, विमलबाई भरकड, स्वाती मोरे,सुरेखा माने,आश्वीनी भरकड, सरूबाई देवसरकर, शिल्पा बंडेवार, आरती भरकड, पुनम देवसरकर, संध्या पवार, वाघमारे, यांच्या सह महिला व युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी नयनरम्य दिपोत्सव व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

सिडको व हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा व जिजाऊ सृष्टी सिडको येथेही सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने दिपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जिजाऊ ब्रिगेड महिला पदाधिकारी ज्योती पाटील, कमलताई हिवराळे,सुजाता शिंदे,सुनिता कदम, अनुराधा पाटील,सुरेखा कल्याणे, गिरडे ताई, पाटील ताई,रेवता हुंबाड, यांच्या सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
