किनवट,परमेश्वर पेशवे। आषाढी एकादशीची वारी म्हणजेच विठुरायाच्या दर्शनाची वारकऱ्यांना मोठी आस लागलेली असते वारकऱ्यांचे पावले पायी दिंडी विविध वाहने यासह पंढरपूर गाठून चंद्रभागेत स्नान करुन लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारीला जाताना भाविकांनी घरातील मोहमाया दूर ठेवून वाटेने केवळ विठ्ठल नामाचा गजर करीत विठ्ठलाचा जयजयकार करित निघाल्यावर निश्चितच पांडुरंग वारकऱ्यांच्या मनोकामना पूर्ण करीत असतो यावर्षी तर पांडुरंगाच्या दर्शनासाठी दुर्गा फाउंडेशनने सामान्य वारकऱ्यांसाठी परिवहन महामंडळाची बस सेवाच उपलब्ध करून दिली. वारकर्यांचे दर्शन सुखकर व प्रवासही निर्विघ्नपणे पार पडावा अशा शुभेच्छा आषाढी वारीसाठी निघालेल्या भाविकांना निरोप देताना योग गुरु आखील खान यांनी दिल्या.
भाजपचे नेते सुधाकर भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीला दुर्गा फाउंडेशन च्या वतीने व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जाण्याला एसटी महामंडळाची विशेष बसची व्यवस्था केली. दिनांक 15 जून रोजी दुपारी बारा वाजता विठुरायाचा वारीसाठी निघालेल्या भाविकांना निरोप देण्यासाठी शिवाजी चौकात आयोजित कार्यक्रमात योग तज्ञ अखिलखान पत्रकार प्रदीप वाकोडीकर त्यांनी आपल्या मनोगतातुन दुर्गा फाउंडेशने आयोजित केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
भाजपा नेते सुधाकर भोयर त्यांनी प्रास्ताविकातून आषाढी वारीची माहिती दिली व या वारीला जाणार्या भाविकांना सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले. 45 प्रवाशांना घेऊन बस पंढरपूर कडे रवाना झाली यावेळी भाजपा नेते अशोकराव नेम्मानीवार, आनिल पाटील सूर्यवंशी, भाजपाचे तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार, शहराध्यक्ष संतोष चनमनवार, व्यापारी श्रीनिवास नेम्माणीवार, प्रवीण श्रीमनवार, किशोर हसबे, विनायक जाधव, अक्षय पावडे, गंगाधर तोटरे, राजू शिरपुरे यांचेसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक या निरोप कार्यक्रमाला उपस्थित होते.