नांदेड| वैद्यकीय (एमबीबीएस) प्रवेशासाठी पहिल्याच यादीत पात्र ठरूनही केवळ घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ओम आडकिने या होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न भांगण्याची भीती निर्माण झाली असून त्याचे साकार होण्यासाठी दानशूर व्यक्तींनी त्याला मदतीचा हात पुढे करून आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन त्याच्या पालकांनी केले आहे.
पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती येथे पहिल्या यादीत सेमी गव्हरमेंट मधून प्रवेशासाठी पात्र ठरूनही पुढील दोन दिवसात सात लाख रुपयांची व्यवस्था करू न शकल्यास ओम आडकीनेच्या MBBS प्रवेशाचे स्वप्न भंगण्याची भिती ओमच्या पालकांनी जड अंतकरणाने व्यक्त केली आहे. NEET परीक्षेत ६१३ गुण घेऊन प्राविण्य प्राप्त केले असले तरी यावर्षीच्या वाढत्या कट ऑफमुळे ६१३ गुणाला गव्हरमेंट कॉलेजमध्ये मिळू शकले नाही. सेमी गव्हरमेंट मध्ये प्रवेशास पात्र ठरूनही प्रवेश घेण्याची आर्थिक परिस्तिती नसल्यामुळे ओमचे वडील सुरेश आडकीने यांनी मदतीचे नम्रपणे आवाहन केले आहे.
ओमला पुढील दोन दिवसांमध्ये सात लाख रुपये रक्कम जमा करावयाची आहे. परंतु त्याच्याकडे सध्या फक्त दोन लाख रुपये जमा झाले आहेत. उर्वरित रक्कम जमा न झाल्यास जिद्दीने अभ्यास करून वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या ओमच्या मेडिकल प्रवेशाची संधी हुकन्याची भीती निर्माण झाली आहे. याकरीता पुढील अकाउंट नंबर हा ओम सुरेश अडकिणे यांचा असून आपण अकाउंट नंबर वर स्वछेने आर्थिक मदत पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
ओम सुरेश आडकीने, फोन पे नंबर 9373106167
ACCOUNT NUMBER 41565127565
STATE BANK OF INDIA Branch Code
16667,,, IFSC CODE- SBIN0016667