नवीन नांदेड| सिडको हडको परिसरातील सर्वात मोठी गणेश मूर्ती असलेला व भक्तांचा ईच्छा मनो कामना,नवसाला पावणारा ओकांर गणेश मंडळ असुन गणेश मूर्तीला नवस करणारा भाविक भक्त हा पाचशे शंभर ,दोनशे ,पन्नास रूपये नोटांच्या हार अर्पण करत असून राजकीय पदाधिकारी व आजीमाजी लोकप्रतिनिधी सह नांदेड परिक्षेत्र उपमहासंचालक शहाजी ऊपाम यांनी भेट दिली आहे.
हडको परिसरातील एन. डी. ३२ सार्वजनिक भागात गेल्या ३४ वर्षापूर्वी ओकांर गणेश मंडळ स्थापना झाली असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ओकांर गणेश मंडळाने हैदराबाद येथुन २४ फुट ऊची असलेली आकर्षक व सुबक असलेली मुर्ती स्थापना केली, या गणेश मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे सिडको हडको सह ग्रामीण भागातील व नांदेड शहरातील हजारो भाविक भक्तांना नवसाला पावणारा गणपती म्हणून खाव्याती असून, दरवर्षी हजारो भाविक भक्त नवस करून गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी दरम्यान गणपतीला नोटांच्या हार अर्पण करून नवस पूर्ण करतो व कुटुंबसाह आरती करून नवस फेडण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात, दैनंदिन सकाळ व संध्याकाळी समुधर आवाजातून संगीतमय महाआरती आयोजित करण्यात आली आहे.
मंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी विविध स्पर्धा तर महिला वर्गासाठी विशेष अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून ,मंडळाच्या वतीने धार्मिक, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असून हडको भागातील महिला,युवक, जेष्ठ नागरिक यांनी वेळी वेळी सहकार्य केले असून आज पर्यंत भाविक भक्तांनी केलेल्या नवस पुरती मधुन आर्थिक सहकार्य लाभले आहे तर परिसरातील अनेक भागातून ही या मंडळाला मोठ्या प्रमाणात देणगी उपलब्ध झाली आहे. मंडळचे अध्यक्ष विनोद जाधव, उपाध्यक्ष हर्षल जाधव, सचिव अक्षय बुद्रुक,कोषाध्यक्ष अशोक गुडेवार, सदस्य,महेश शिंदे,संजय श्रीरामे, अजय गालेवाड, डि.वाय.मिसाळ, विक्की मुधोळकर यांच्या सह परिसरातील युवक पदाधिकारी हे परिश्रम घेत आहेत.
या मंडळाला नांदेड परिक्षेत्र ऊप महासंचालक शहाजी ऊमाप यांनी भेट दिली यावेळी मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले, तर शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख आंंनदराव पाटील बोढांरकर, डॉ.सचिन पाटील ऊमरेकर,यांच्या सह माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,नांदेड दक्षिण आमदार मोहनराव हंबर्डे,मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या सह सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, पत्रकार यांनी भेट दिली आहे. अनंत चतुर्दशी दिवशी हडको सह सिडको हडको परिसरातील मुख्य मार्गावरून ओकांर गणेश मंडळाच्यी ढोल ताशा,फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.