Okanar Ganesha Mandal : नवसाला पावणारा हडको येथील ओकांर गणेश मंडळ, भक्तांची दर्शनासाठी गर्दी -NNL
नवीन नांदेड| सिडको हडको परिसरातील सर्वात मोठी गणेश मूर्ती असलेला व भक्तांचा ईच्छा मनो कामना,नवसाला पावणारा ओकांर गणेश मंडळ असुन गणेश मूर्तीला नवस करणारा भाविक भक्त हा पाचशे शंभर ,दोनशे ,पन्नास रूपये नोटांच्या हार अर्पण करत असून राजकीय पदाधिकारी व आजीमाजी लोकप्रतिनिधी सह नांदेड परिक्षेत्र उपमहासंचालक शहाजी ऊपाम यांनी भेट दिली आहे.
हडको परिसरातील एन. डी. ३२ सार्वजनिक भागात गेल्या ३४ वर्षापूर्वी ओकांर गणेश मंडळ स्थापना झाली असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ओकांर गणेश मंडळाने हैदराबाद येथुन २४ फुट ऊची असलेली आकर्षक व सुबक असलेली मुर्ती स्थापना केली, या गणेश मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे सिडको हडको सह ग्रामीण भागातील व नांदेड शहरातील हजारो भाविक भक्तांना नवसाला पावणारा गणपती म्हणून खाव्याती असून, दरवर्षी हजारो भाविक भक्त नवस करून गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी दरम्यान गणपतीला नोटांच्या हार अर्पण कर...
