नांदेड| नऊ वर्षाची आरोही नावाची बालिका मूत्रपिंडाच्या आजाराने वर्षभरापासून मृत्यूशी झुंज देत दिवस काढत होती. लहान मुलीला मूत्रपिंड (किडणी) कोण देणार(?) असा जटिल अनुत्तरित प्रश्न आई वडिलांच्या समोर उभा होता. आजोबा तयार झाले पण लहान लेकरात ते ट्रान्सप्लांट करणे वैद्यक क्षेत्रात फार मोठे आव्हान होते. नांदेडच्या श्री गंगा हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध किडनी तज्ज्ञ डॉ शहाजी जाधव यांनी अत्यंत जटिल व जिकरीचे शस्त्रक्रिया केली यशस्वी केली.आजोबाच्या किडनीचे प्रत्यारोपण नातीत केले आणि तिला जीवदान मिळाले. मराठवाड्यात कदाचित पहिलीच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेमुळे नांदेडच्या वैद्यक क्षेत्राचा निपुणता सिद्ध करणारी आहे .


लातूर जिल्यातील अहमदपूर येथे राहणाऱ्या आरोहीच्या दोन्ही किडनी अनुवांशिक आजारामुळे खराब झाल्या होत्या मागील एका वर्षा पासून ती डायलिसिसवर होती. डायलिसिसचा तीला खूप त्रास होत होता. आई वडील चिंताग्रस्त होते. लातूर येथील डॉक्टरांनी आरोहीच्या आई वडिलांना किडनी प्रत्यरोपांचा सल्ला दिला. नांदेडसह मराठवाड्यातील प्रसिद्ध मूत्रपिंड तज्ज्ञडॉ शहाजी जाधव हे नांदेडच्या श्री गंगा हॉस्पिटल मध्ये आहेत. त्यांच्याकडे मुलीला दाखवावे असे त्या डॉक्टरांनी सांगितले. किडनी प्रत्यरोपणासाठी कुटुंबातील सर्वजण डॉक्टर जाधव यांना भेटले, आजोबानी किडनी देण्याची तयारी दर्शवली.

नऊ वर्षीच्या आरोही मध्ये किडनी ट्रान्सप्लांट हे डॉक्टरांसाठी मोठे आव्हान होते. किडनी प्रत्यरोपण तज्ञ् डॉक्टर शहाजी जाधव यांच्या मते मोठया वक्तीची किडनी लहान मुलांमध्ये ट्रान्सप्लांट करणे खूप कठीण असते कारण लहान मुलांमध्ये जिथे आपण किडनी ट्रान्सप्लांट करतो ती जागा किडनीच्या आकारापेक्षा खूप कमी असते. परंतु श्री गंगा हॉस्पिटल येथील ट्रान्सप्लांट टीम ने पाच तास ऑपेरेशन केले अन आजोबांची किडनी प्रत्यारोपण यशस्वी रित्या केली.


ता आरोही पूर्णपणे ठीक आहे आणि तिच्या आजोबाची तबियत चांगली असून, दोन दिवसांपूर्वी त्यांना हॉस्पिटल मधून सुट्टी देण्यात आले. श्री गंगा हॉस्पिटल चे संचालक अस्थीरोग तज्ज्ञ डॉ विजय कागणे , अस्थीरोग तज्ज्ञ डॉ राजेश्वर पवार संचालक व टीमने डॉ शहाजी जाधव व सहकार्याचे अभिनंदन केले
या कठीण शस्त्रक्रियेसाठी डॉ डॉ.राजीव राठोड, डॉ. प्रमोल हंबर्डे, भूल तज्ज्ञ डॉ. पवन मल्लमवार, डॉ. बोकारे, डॉ. जयश्री कागणे मेंदूविकार तज्ज्ञ.डॉ.संदीप गोरे, डॉ. लक्ष्मीकांत भोपळे, डॉ आशिष हटकर यांच्यासह टिमने परिश्रम घेतले. डोळ्यात अश्रू घेऊन आलेले कुटुंब हसत गेले. आजोबामुळे नऊ वर्षाच्या नातीला जीवनदान मिळाले. मराठवाड्याच्या वैद्यकीय क्षेत्रांत नांदेडमध्ये झालेली ही शस्त्रक्रिया मैलाचा दगड होय.

मराठवाड्यातील पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
लहान मुलांच्या किडनी ट्रान्सप्लांट ची सुविधा महाराष्ट्रात खूप कमी हॉस्पिटल मध्ये आहे. मराठवाड्यात पहिल्यांदा एवढ्या लहान मुलीची किडनी ट्रान्सप्लांट आपल्या नांदेडच्या श्री गंगा हॉस्पिटलमध्ये किडनी तज्ज्ञ डॉक्टर शहाजी जाधव यशस्वीपणे पार पडले, त्यामुळे या रोगाच्या रुग्णांना आश्वासक जगण्याचे बळ देणारा एक नवीन आशेचा किरण मिळाला आहे.
मुलाला मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज का भासते?
मूत्रपिंड निकामी झाल्यास किंवा मूत्रपिंड निकामी झाल्यास मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शिफारस केली जाते. ही समस्या मुलांची वाढ, हाडांच्या ताकद आणि नसांवर प्रतिकूल परिणाम करू शकते. यामुळे शरीरात विषारी कचरा जमा होतो जो अखेरीस चयापचयवर परिणाम करतो त्यामुळे गंभीर अपंगत्व आणतो. जन्मजात दोष: ४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचे हे प्रमुख कारण आहेत. हे अनुवंशिकतेमुळे असू शकतात किंवा अस्वस्थ गर्भधारणेमुळे आईच्या गर्भाशयात विकसित होऊ शकतात. असा कारणामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज भासते.

