उमरखेड,अरविंद ओझलवार। नुकताच नीटचा रिझल्ट लागला असून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील कुमारी नेहा कुलदीप माने ही 720 पैकी 7 20 गुण घेऊन आल्याचा मान तिने मिळवला आहे.
उमरखेड तालुक्यातील बोरी चातारी येथील शिक्षक असलेले कुलदीप माने यांची कु . नेहा ही मुलगी असून उमरखेड जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक तथा सेवानिवृत्त लघु पाटबंधारे विभागाचे एस डी ओ रामराव शावजी माने पाटील . यांची नात असून कु . नेहा कुलदिप माने हिने देश पातळी वरील वैद्यकिय प्रवेशासंबंधीची परिक्षा निट परिक्षेत 720 पैकी 720 गूण मिळवून उमरखेड तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण भारतात एक मोठे उत्तूंग यश मिळवले.
अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेची अभ्यासू नेहा लहाणपणा पासून गुणवत्तेत आघाडी वर आहे . माने परिवाराची लेक… धानोरा येथील डॉ. प्र.भा.काळे सरांची नात …आज उत्तूंग यशाची मानकरी झाली आहे . कु . नेहा ची एम्स मध्ये प्रवेश घेण्याची ईच्छा आहे. उमरखेड तालुका हा यवतमाळ जिल्ह्यातील शेवटचे टोक असून या तालुक्यातील कु नेहा कुलदिप माने हिला देशातून प्रथम येण्याचा मान तिने मिळवला आहे.
कुमारी नेहा कुलदिप माने ही वर्ग पहिली ते आठवी श्री गुरुदेव गोरोबा विद्यालय उमरखेड येथे वर्ग नववी ते दहावी महात्मा फुले विद्यालय नांदेड येथे शिक्षणासाठी गेली पुढील अकरावी व बारावी ही गोदावरी कनिष्ठ महाविद्यालय नांदेड येथे तिने पूर्ण केले लहान वयापासूनच हुशार असणारी नेहा हिला वर्ग दहावी मध्ये 97 टक्के गुण तर बारावी मध्ये 81 टक्के गुण घेतले होते .
लहानपणापासून अभ्यासातत निपुण असलेल्या नेहाने आठवीत असताना स्कॉलरशिप यवतमाळ जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला होता . तसेच तिला डॉ.होमी बाबा विज्ञान केंद्रातून गोल्ड मेडलिस्ट परीक्षेत गोल्ड मेडल मिळाले होते
नीटची परीक्षा ही अति कठीण असून नेहाने पहिल्याच प्रयत्नात नीट मध्ये 720 मार्ग घेऊन देशामध्ये पहील्या रँकवर आली त्यामुळे तिचे सर्वत्र तिचं कौतुक होत आहे. नांदेड येथे तिने नीट चे क्लासेस लावले असून या यशाचे श्रेय तीनं आपले आजोबा रामराव माने,आजी,आई, वडील कुलदीप माने व तिची छोटी बहीण कु. निधी हिला दिले आहे. कुलदीप माने हे श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चातारी येथे शिक्षक आहेत. एक उत्कृष्ट डॉक्टर होण्याचा मानस नेहाचा असून एम्समध्ये प्रॅक्टिस करण्याचा मनोदय नेहाने व्यक्त केला आहे.