श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर |श्री रेणुकादेवी संस्थान माहूरगडावर दि.३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान साजरा होणा-या शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त दि.२७ रोजी पुर्व तयारी आढावा बैठक जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष सुरेखा कोसमवार यांच्या अध्यक्ष खाली घेण्यात आली, उत्सवा दरम्यान महाराष्ट्रा सह अनेक राज्यातून भाविक दर्शन करीता येतात ज्यात्या भागातली वेगवेगळी बोली भाषा आहे ती समजून घेऊन व प्रत्येक अधिकारी कर्मचारीनी भाविकांना सौजन्याची वागनूक देऊन नवरात्र उत्सव साजरा करावा असे त्यांनी सागितले.
गडावरील परशुराम मंदिर परिसरात दि.२७ सेप्टेंबर रोजी दु,२ वा बैठकिचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष सुरेखा एस.कोसमवार.जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक सूरज गूरव (प्रभारी) ,सहा. जिल्हाधिकारी किनवट तथा सचिव मेघना कावली, यांच्या उपस्थितीत या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध उपाध्यक्ष रामकृष्ण मळघणे. माहूरचे तहसीलदार तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध कोषाध्यक्ष किशोर यादव,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.किरण वाघमारे, माहूर नगर पंचायतचे मुख्याधिकारी विवेक कादे, वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव,गटविकास अधिकारी सूरेश काबळे,सपोनी शिवप्रकाश मुळे, सार्वजनिक बाधकाम विभागाचे भिसे,राज्य परिवहन मंडळ आगार प्रमुख चिबडे,ता.आरोग्य अधिकारी राजेश्वर माचेवाड,विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता वैभव कुलकर्णी,आदींनी नवरात्र उत्सव काळातील नियोजनाबाबत माहिती दिली. या बैठकीत प्रत्येक विभागा मार्फत यात्रा नियोजना साठी केलेल्या नियोजनाची माहिती वरिष्ठांना दिली. राज्य परिवहन मंडळ तर्फे नवरात्र उत्सव काळात ११० बस उपलब्ध असल्याची माहिती सी.आर.समर्थवाड यांनी दिली.
श्री रेणुका देवी, दत्त शिखर,अनुसया माता, मंदिर परीसरातील भाग राखीव वनक्षेत्रात असून सर्व बाजूने जंगल परीसर आहे,वनविभागाने ५ वनपाल,२१ वनसक्षक असणार असल्याचे सागितले, आरोग्य विभाग तर्फे रेणुकामाता मंदिर पायथ्याशी व दत्तशिखर ,अनुसयामाता मंदिर असे एकूण तीन ठिकाणी आरोग्य पथक असून २५ वैद्यकीय अधिकारी, ३ रुग्णवाहिका, ४० परिचारिका, २० आरोग्य सहाय्यक तैनात करण्यात येणार असून ते २४ तास तीन पाळीत उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.माचेवाड यांनी दिली.ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाघमारे यांनी ग्रामीण रुग्णालयात ५० बेड व रुग्णवाहिका व औषधीसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले.
विद्युत वितरण कंपनी तर्फे उत्सव काळात विद्युत यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली असल्याचे सागितले, नवरात्र उत्सवा दरम्यान खाजगी वाहनांना गडावर जाण्यास दरवर्षीप्रमाणे प्रतिबंध करण्यात आले असून भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ३ ठिकाणी पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सागितले, वाहन तळा पासूनच रापमच्या बसेस ची व्यवस्था करण्यात आली आहे. न.पं.तर्फे शहरात पाच महत्वपूर्ण ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, नियंत्रण कक्ष, मोबाईल टॉयलेट, पाणी पुरवठा सुरळीत ठेवणे व पाणी भाविकासाठी उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्याधिकार विवेक कादे यांनी सांगितले. पोलीस विभाग तर्फे १ उपविभागीय अधीकार ७ पोनी,१९ सपोनी/सपोउपनी,२७० अमलदार,४० वाहतूक पोलीस व होमगार्ड, तैनात करणार असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सूरज गूरव यांनी सांगितले .
यावेळी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव.अरविंद देव, दुर्गादास भोपी,शुभम भोपी,व्यवस्थापक योगेश साबळे,नपचे कार्यालईन आधिक्षक वैजनाथ स्वामी,सा.बा.चे कनिष्ठ अभियंता रविन्द्र उमाळे,राज्य उत्पादन शुल्क सपोउपनी पवार,अन्न व प्रशासन विभाग यांची उपस्थिती होती. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष सुरेखा कोसमकर यांनी यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करून भाविकांची यात्रा सुखकर करण्यासाठी श्री रेणुकादेवी संस्थान व विश्वस्त समिती सज्ज असल्याचे सांगितले.सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांना यात्रा उत्सव काळात दक्ष राहण्याचे आदेश वरिष्ठांनी यावेळी दिले.