Homeक्राईमNanded police arrested the accused with Gavathi pistol, dagger and stolen items...

Nanded police arrested the accused with Gavathi pistol, dagger and stolen items | नांदेड पोलीसांनी एक गावठी पिस्टल खंजर व जबरी चोरी व चोरी मधिल 2,90,700/- मुदेमाल जप्त करुन उलेखनिय कामगिरी -NNL

नांदेड। पोलीसांनी एक गावठी पिस्टल खंजर व जबरी चोरी व चोरी मधिल 2,90,700/- मुदेमाल जप्त करुन उलेखनिय कामगिरी केली आहे, पोलिसांच्या कामगिरी बद्दल पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अभिनंदन केले आहे.

श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड व मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांचे आदेशाने रेकॉर्ड वरील, पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अवैध धंद्यावर कार्यवाही करणे व संशईत हालचालीवर लक्ष ठेवणे करीता सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांना आदेशात केले होते.

त्यांच्या मार्गदर्शन व सुचनेवरुन उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकों / चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, सायबर शाखेचे राजेद्र सिटीकर, दिपक ओढणे यांनी दिनांक 16/07/2024 रोजी 16.45 वाजताच्या सुमारास कामठेकर यांचे घराजवळ कौठा नांदेड येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन छापा टाकुन आरोपी नामे 01. अमन किशोर जोगदंड वय 20 वर्षे व्यवसाय बेकार रा. खोब्रागडे नगर गल्ली क्र. 02 नांदेड 02. आकाश गजानन गणगोपलवार वय 23 वर्षे व्यवसाय बेकार रा. पुष्प नगर पावडेवाडी नाका नांदेड 03. कपिल हिरामण सदावर्ते वय 27 वर्षे व्यवसाय अॅटो चालक रा. चेअरमन पाटी पुर्णा रोड नांदेड यांना ताब्यात घेतले.

त्याच्या ताब्यातील विनापरवाना बेकायदेशीर बाळगलेले एक गावठी पिस्टल, एक खंजर व सोन्याचे दागिने, एक मोटार सायकल जप्त केले आहेत. यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गुन्हा नोंद क्रमांक 617/2024 कलम 3/25, 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि श्री महेश कोरे करीत आहेत. सदर आरोपींतांनी मागिल एक महिन्यापुर्वी रवि नगर कौठा नांदेड व वसमत जि. हिंगोली येथे चैन स्नॅचिंग केले व साठे चौक येथे मोटार सायकल चोरी केले असल्याची सांगितले आहे.

यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण व वसमत शहर जि. हिंगोली अभिलेखावर माहिती काढले असता पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण गुरन 487/2024 कलम 392,34 भादवि, पोलीस स्टेशन वसमत शहर जि. हिंगोली गुरन 393/2024 कलम 392,34 भादवि व पोलीस स्टेशन शिवाजी नगर गुरन 287/2024 कलम 303 (2) भा.न्या.स. प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर कार्यवाही बाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड,  अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड व ईतर वरिष्ठांनी गुन्हे शोध पथक उपविभाग इतवारा, नांदेड यांचे कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments