नांदेड| दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-हडपसर-नांदेड या मार्गावर लातूरमार्गे चार विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


नांदेड ते हडपसर – २ फेऱ्या


गाडी क्रमांक 07607
प्रस्थान : हुजूर साहिब नांदेड
📅 दिनांक : 21 ऑक्टोबर 2025 आणि 28 ऑक्टोबर 2025 (मंगळवार)
⏰ वेळ : सकाळी 08.30
मार्गातील थांबे : पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी शहर, कुर्डूवाडी, दौंड
पोहोच : हडपसर – रात्री 21.40


हडपसर ते नांदेड – २ फेऱ्या

गाडी क्रमांक 07608
प्रस्थान : हडपसर
📅 दिनांक : 21 ऑक्टोबर 2025 आणि 28 ऑक्टोबर 2025 (मंगळवार)
⏰ वेळ : रात्री 22.50
मार्गातील थांबे : दौंड, लातूर, परळी, परभणी
पोहोच : हुजूर साहिब नांदेड – दुसऱ्या दिवशी दुपारी 12.15
या विशेष गाड्यांमध्ये 22 डब्बे असतील. अधिकृत वेळापत्रकही सोबत जोडले असल्याचे जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांनी कळविले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी संपादकांना ही माहिती प्रसारित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


