नांदेड| नांदेडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना सिने अभिनेता विनय देशमुख यांनी गाईंचे शेण,माती,गोमुत्र पासुन बनवलेली “गणेश मुर्ती” गोमय गणेश भेट दिली आहे. पर्यावरण पुरक गणेश मुर्ती असल्याने राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
गणेश उत्सव काळात श्री गणेशाची प्लास्टर ऑफ पॅरीस पासुन बनवलेल्या मुर्ती पुजेत ठेवतात. नंतर त्याचे विसर्जन करतात परंतु प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती पाण्यात दिर्घ काळ तशाच राहुन पर्यावरणास बाधक ठरतात याला पर्याय म्हणुन शाडु मातीच्या मुर्ती ही संकल्पना समोर आली. याही मुर्ती विसर्जनानंतर त्याचा गाळ साचतो. याही पुढे जाऊन अभिनेता विनय देशमुख यांनी गाईंच्या शेण गोमुत्रा पासुन गोमय गणेश बनवण्याचे काम मागिल दोन वर्षा पासुन सुरू केले आहे.
गोमय गणेश पाण्यात सहज विरघळतो, तुळशी वृंदावनात विसर्जीत केल्यास त्याचे खत बनते, या मुर्तीत वेगवेगळ्या वनस्पतीच्या ज्यात तुळशी, साग, बेल, आदी बिया आहेत त्या रूजुन त्याचे झाड तयीर होते, गत वर्षी मुंबई मंत्रालय येथे पर्यावरण मंत्रालया कडुन स्टॉल लावल होता, येथे त्यांच्या स्टॉलला चांगल पाठबळ मिळाल, यंदाही त्यांनी गोमय गणेश मुर्ती तयार केल्या आहेत, गणेश उत्सवा पुर्वी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेवुन त्यांना मुर्ती भेट दिली, त्यांच्या उपक्रमाच कामाच कौतुक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केल.
नांदेड जिल्हयातील हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथिल माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख यांचा अभिनेता विनय देशमुख हा मोठा मुलगा असुन डॉ. वृषाली देशमुख ह्या सुनबाई आहेत दोघेही उच्च शिक्षीत आहेत, ३३ कोटी नावाने ते गाईंचे शेण, गोमुत्रा पासुन ते गणेश मुर्ती, राख्या, दिवे, धुप, अगरबत्ती अशा अनेक वस्तु ते बनवतात, याला भारतासह परदेशात चांगली मागणी आहे. बनवण्यात येणाऱ्या सर्व वस्तु पर्यावरण पुरक असतात.
तसेच हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल भगत यांची भेट घेवुन माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख यांनी गोमय गणेश मुर्ती भेट दिली. गोमय गणेश मुर्तीचे महत्त्व सांगितले, अशा मुर्ती लोकांनी वापरून पर्यावरणाच रक्षण केल पाहिजे हा उपक्रम खुप चांगला असल्याच भगत यांनी प्रशंसा केली.