करियरनांदेड

Tehsildar Surekha Nande : हदगाव तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा नांदे ‘मराठवाडा आयकॉन ’ पुरस्कार

हदगाव, शेख चांदपाशा| हदगावच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांना त्त्यांच्या कार्याची दखल घेत ‘नवभारत / नवराष्ट्र’ या प्रसिद्ध राष्ट्रीय दैनिकांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘मराठवाडा आयकॉन’ पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात ‘मराठावाडा आयकॉन ‘ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

जनसामान्यांच्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक बांधिलकीने काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान केल्यामुळे त्यांना प्रेरणा मिळते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. या अनुषंगाने हदगाव येथील कर्तव्यदक्ष आणि गोरगरीब, वंचित, कष्टकरी जनतेला समाजिक पद्धतीने शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब अबाल वृद्धासाठी देवदूत ठरत असलेल्या हदगावच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांना त्त्यांच्या कार्याची दखल घेत ‘नवभारत / नवराष्ट्र’ या प्रसिद्ध राष्ट्रीय दैनिकांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘मराठवाडा आयकॉन’ पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात ‘मराठावाडा आयकॉन ‘ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रशासकीय कार्याची दखलच आहे.

या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, जालना जिल्ह्याचे खा. कल्याण काळे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, नवभारतचे ग्रुप प्रेसिडेंट ए. श्रीनिवास, सर्व व्यवस्थापक कल्याण पांडे यांची उपस्थिती होती. हदगांव तालुक्याच्या श्रीमती सुरेखा नांदे यांनी प्रशासकीय मर्यादांच्या चौकटीत राहूनही सामान्य जनतेच्या हिताचे, कल्याणकारी निर्णय घेतले. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असणारे रस्ते अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे बंद झाले होते. या रस्त्यांवरील चिखल तुडवीत शेतकऱ्याच्या बांधांवर जाऊन, गुडघ्याभर चिखलात उतरून त्यांनी हे अतिक्रमण हटविले.

केवळ कायदेशीर आदेश न देता, अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांशी समुपदेशनाच्या व समन्वयाच्या माध्यमातून संवाद साधत त्यांनी या गंभीर प्रश्नांची सोडवणूक केली.ग्रामीण भागातील स्मशानभूमी वरील अतिक्रमणाचा प्रश्नही त्यांनी विविध गावांमध्ये विशेषत्वाने सोडविला आहे. शासकीय नकाशावरील शिवपांदण व पारंपरिक पांदण रस्ते पुन्हा मोकळे करून स्मशानभूमीपर्यंतचा मार्ग सर्वांसाठी खुला केला आहे. ग्रामीण भागातील संवेदनशील प्रश्नांवर त्यांनी केवळ प्रशासकीय दृष्टिकोन न ठेवता मानवीय दृष्टिकोनातून विचार केला. तसेच प्रत्यक्ष कृती आराखडा राबवून त्वरित निर्णयांचीअंमलबजावणी देखील केली आहे. मराठवाडा आयकॉन पुरस्कार भेटल्याने विविध राजकीय पक्षांचे नेते , सामाजिक कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांनी व विविध कर्मचारी संघटनाच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button