नांदेडआरोग्य

diagnostic camp : शेवडी (बा) येथे; रोगनिदान शिबिरात २२५ रूग्ण व ७५ बालकांची आरोग्य तपासणी व उपचार

लोहा| तालुक्यातील शेवडी (बा) येथे ग्रामपंचायतच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्व रोगनिदान शिबीर घेण्यात आले. सेवा जनशक्ति पार्टीचे संस्थापक भूमिपुत्र प्रा मनोहर धोंडे याच्या उपस्थितीत हे शिबीर पार पडले. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल घंटे व टीमने मधुमेह ,हृदयरोग, स्री रोग, दंत तपासणी, पोटविकार असा २२५ रुग्णाची व ७५ बालकांची तपासणी केली त्यांना प्राथमिक उपचार करण्यात आहे.

ग्राम पंचायत कार्यालय शेवडी( बा ) याच्या वतीने आयोजितआरोग्य व रोग निदान शिबीर घेण्यात आले शिवा संघटना संस्थापक तथा सेवा जनशक्ति पार्टी पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. त्यांनी या शिबिराचा ग्रामस्थांना फायदा होईल असे सांगून ग्रामपंचायतीच्या करत असलेल्या विकास कामाचे त्यांनी कौतुक केले.

हृदयरोग तज्ज्ञ, डॉ.राहुल घंटे, डॉ.स्वप्निल कंकरे, डॉ.लक्ष्मीकांत भोपळे, डॉ.गोपाळ चव्हाण,बालरोगतज्ज्ञ डॉ.सुनील ब्याळे,नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.अनिकेत काळेगोरे, डॉ. चंदन धोंगडे, डॉ.देवानंद तेजबंद, डॉ.रहेमान यांनी रुग्ण तपासणी केली. यात मधुमेह व हृदयरोग -९०, पोटविकार -२५, स्त्रीरोग-२५, नेत्र -३३, तसेच दंत व अन्य ५२ तसेच ७०बालके यांची तपासणी व त्यावर उपचार करण्यात आला.

यावेळी सरपंच कैलास धोंडे, सरपंच बसवेश्वर धोंडे, उपसरपंच दतात्रय यजगे, ग्राम ग्रामविकास अधिकारी व हरिहर विश्वासराव, माजी सरपंच तुकाराम लुटे, राजाभाऊ घंटे, संगमेश्वर चपटे तिरुपति येजगे, चांदु एडके, यासिन पालीमकर, पुंडलिक इंदुलवड, मारोती वत्ते, चांदु ऐडके, यासिन पालिमकर, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास राईकवाडे, पोलिस पाटिल तिरुपती येजगे, चेअरमन तुकाराम चिकाळे, शालेय समिती अध्यक्ष शिवा नवबदे, मुख्याध्यापक शिवा ऐजगे, सह ग्रामस्थ, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक ग्राम विकास अधिकारी विश्वासराव यांनी केले. संचलन शिवा येजगे यांनी केले. गावागावात राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती सरपंच बसवेश्वर धोंडे यांनी दिली आभार जायभाये यांनी मानले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button