नागपूर| नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बनचिंचोली, साप्ती, तळणी, गोजेगाव, भानेगाव, उंचेगाव, बेचिराग पांगरा तसेच हिमायतनगर तालुक्यातील घारापूर येथील शेतकरी बांधवांचे शिष्टमंडळ नागपूर अधिवेशनादरम्यान आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासनदरात योग्य मावेजा मिळावा या मागणीसंदर्भात भेटले.


शासनामार्फत संबंधित भूसंपादनातील जमीन जिरायती म्हणून नोंदवली असली तरी प्रत्यक्षात ती बागायती स्वरूपाची असल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे बागायती जमिनीप्रमाणे मावेजा देण्याची ठोस मागणी आमदार कोहळीकर यांनी शासनाकडे केली.

या मागणीचा तातडीने विचार व्हावा यासाठी आमदार कोहळीकर यांनी शिष्टमंडळासह महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनस्थळी भेट घेऊन, शेतकऱ्यांच्या न्याय्य हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची विनंती केली. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी आमदार सातत्याने प्रयत्नशील असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



