लोहा l कोणत्याही गावाला भागाला मतदार संघाला जिल्ह्याला नेता लागतो ..ते नेतृत्व त्याच मातीत घडते…तेथील भूमीने तो नेता घडविलेला असतो . लहानाचा मोठा केलेला असतो ..त्या नेत्याने यश अपयश पचविलेले असते….एकदा आला अन पैसे देऊन मतदाराना खरेदी करून नेता होतो म्हटल तर कसे चालेल ..मतदार संघासाठी झिजल पाहिजे ४५-५०वर्ष आयुष्याशी खर्ची घालावी लागतात. लोकसंग्रह करावा लागती तेव्हा कुठे या मातीचा सुंगध गल्ली ते दिल्ली पर्यंत दरवळत असतो . असा नेता व नेतृत्व प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत त्याची गरज मतदार संघाला आहे अशा प्रतिक्रिया उघडपणे व्यक्त होत आहेत
लोहा विधान सभा मतदार संघात प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची शनिवारी (९ नोव्हेंबर ) दुपारी लोह्यात प्रचार सभा तर दुसरीकडे नांदेड मध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडली हजारो जनसमुदायाच्या साक्षीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतापरावांशी हसमुख मुक्त संवाद केला त्याच्या हातावर हात आणि पाठीवर . पंतप्रधान मोदींची थाप असे अविस्मरणीय दृश्य उपस्थित जनसमुदायांनी पाहिले .
भाषणात त्याच्या पराभवाचे शल्य खुद देशाच्या प्रधानांनी बोलून दाखवले.नेता कसा असावा प्रतापरावां सारखा धाडसी असावा .असा प्रतिक्रिया उमटल्या पंतप्रधानाच्या सोबत चे फोटो संपूर्ण मतदार संघान व्हायरल झाले आपला भूमीपत्राची उंची मतदारांना पुन्हा कळाली
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड जाहीर सभा होती त्या सभेला पंतप्रधान यांनी संबोधित केले .महायुतीच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पंतप्रधान व्यासपीठावर ओळख करून घेतली चिखलीकरांच्या जवळ आले . काहीमिनिटे थांबले त्यांच्याशी हातात हात देत संवाद केला . व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व प्रतापराव पाटील हे पंतप्रधान मोदीच्या उजव्या व डाव्या बाजूला बसते होते .हे आपल्या मतदार संघासाठी जनतेला अभिमान वाटावा असेच होते.
पंतप्रधान मोदीजी यांनी चिखलीकरांच्या हातावर हात ठेवून संवाद केला . त्यांच्या पाठीवर हात ठेवला एरवी पराभूत उमेदवाराकडे पक्षाचे नेते फारसे लक्ष देत नाहीत पण साहेव हे माणसांची सुखदुःख ओळखणारे व त्याच्या मदतीला धावून जाणारे नेते म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात.देशाचे पंतप्रधान जेव्हा व्यासपीठावर संवाद साधत होते तेव्हा समोरील हजारो उपस्थित कुतुहलाने ते पाहत होते .
खरंच प्रतापराव सारखा नेता नाही असा प्रतिक्रिया उमटल्या.सभा संपल्या नंतर कार्यकर्ते व सामान्य मतदार पुढे येत त्याच्या सोबत फोटो सेल्फी साठी गर्दी करत होते. आपण एक चांगला नेता लोकसभेत पराभूत केला याचे शक्य कदाचित उपस्थित जनसमुदायाच्या मनात बोचत असावे.
खुद पंतप्रधान मोदी यांनी हे शल्य जाहीरपणे बोलून दाखविले मोदींजी सोबत प्रतापरांवांची असलेली पक्की ओळख व जवळीकता त्याचीराजकीय उंची वाढविणारी होय हे सर्व फोटो व व्हिडीओ लोहा मतदार संघात व्हायरल झाली तेव्हा नेता असावा तर प्रतापरावा सारखा असे नेतृत्व आपण जपले पाहिजे बाहेरच्याला बाहेरचा रस्ता दाखवूयात असा कमेंट आल्या.
या नेतृत्वाची लोहा मतदार संघाला गरज आहे. अशा उत्स्फूर्त प्रतिक्रीया उमटल्या पंतप्रधान मोदींची साथ प्रतापरावांच्या पाठीवर थाप आपल्या सर्वांसाठी अभिमान व गौरवाची बाब अडून भुलथापाना बळी पडू नका.. अमाप पैशाला भाळू नका..असा नेता पुन्हा कधीच मिळणार नाही असे सोशल मीडियात जनमत उमटले