उस्माननगर l महाराष्ट्र शासनाच्या वतीने पृथ्वी , वायू , जल , आग्नी , आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित ‘ माझी वसुंधरा अभियान ‘ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दि. १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले.
‘माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२२१८ ग्रामपंचायती अशा एकुण २२६३२ स्थानिक संस्थांनी भाग घेतला होता. यात छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये शिराढोण ता.कंधार जि.नांदेड येथील ग्रामपंचायत ने प्रथम क्रमांक पटकावला असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिराढोण ग्रामपंचायतीला प्रथम पारितोषिक म्हणून ५० लक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
शिराढोण ग्रामपंचायतीने मिळवलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल शिराढोण चे सरपंच प्रा.खुशाल पाटील पांडागळे , ग्रामविकास अधिकारी मुंजाळ साहेब , उपसरपंच पांडुरंग पवार ग्रामपंचायत चे सर्व सदस्य , कर्मचारी यांचे कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजी पाटील पांडागळे, लोहा / कंधार विधानसभा काँग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसिकर साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव आप्पा देवणे , पंचक्रोशीतील सरपंच , चेअरमन , राजकीय नेते मंडळी व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या….।