हिमायतनगर। महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन, विद्यापीठ वर्धापन दिन तसेच केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर, योध्दा हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती मा. मुख्याध्यापक श्री. गजानन रणखांब सर तसेच उपप्राचार्य डाके सर, प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या हस्ते विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. वसंत कदम सर यांनी आपल्या सूत्रसंचालनातून 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा करतात. व तो दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे व तसेच केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. सदरील कार्यक्रमा प्रसंगी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. देशमुख डी.सी. यांनी केले.या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.