हिमायतनगर। मातंग समाज अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षणाचा कागदोपत्री वाटेकरी आहे. परंतु काही विशिष्ट एका जातीनाच या आरक्षणाचा लाभ होत असल्याने, उर्वरित जाती पैकी मातंग समाजाला सामाजिक, शैक्षणिक आरक्षणाचा फायदा होत नाही. या विषयी दिनांक ०१जुलै २४पासून लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक/अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर विविध मागण्या घेऊन बेमुदत आमरण महाउपोषण सुरू केलेले आहे. ते महाउपोषण मागील पाच दिवसांपासून चालत आहे. त्या उपोषणाला पाठींबा म्हणुन हिमायतनगर तालुक्यातील विविध मागण्यांसाठी रास्तारोको करण्यात आला.
भरांडे सरांची तब्येत सतत खालावत आहे. त्यामुळे महाउपोषणाला जाहीर समर्थनार्थ व लाभ वंचित घटकांना स्वतंत्र अबकड आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावे.अशी न्यायाची मागणी घेऊन आज दिं.०४जुलै२४ रोजी मौजे पोटा बु.येथील भोकर-हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावर लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर जिल्हाचे धोंडोपंत बनसोडे व सदानंद ऐरणकर पार्डीकर तालुकाध्यक्ष हिमायतनगर यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे. रास्ता रोकोमध्ये गगन भेदी घोषणा देऊन लक्ष वेधून घेतले होते. येणाऱ्या काळात येथील खासदार आमदार यांनी आमच्या मागण्या विषयी सभागृहात प्रश्न उपस्थित नाही केल्यास, लोकप्रतिनिधीच्यां प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले जाईल असे ही भावना व्यक्त केल्या आहेत.
तसेच तालुका पदाधिकारी व समाज बांधवा सह शेकडो महिलांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर उतरून भव्य रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे शेकडों वाहने दीड तासा पासुन रस्त्यांवर अडकून पडली होती. राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांवर वाहतूक थांबल्यामुळे लांबलचक रांगा लागल्या होत्या. यामुळे अनेक प्रवाश्याचे बेहाल झाले होते.अखेर या ठिकाणी तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणुन तलाठी मनोजकुमार गंगासागर व पोलीस निरीक्षक शरदचंद्र जराड हिमायतनगर यांना निवेदन देऊन आमच्या तीव्र भावना सरकार कडे रास्ता रोकोच्या माध्यमातून कळवावे,असे म्हणत आंदोलनाची सांगता करण्यात आली होती.
या रास्ता रोको आंदोलनामध्ये रामदास जळपते तालुका सचिव, गोविंदमामा जळपते पोटेकर,पत्रकार आनंदराव जळपते, श्रीमती गयाबाई पोतरे,वंदनाबाई जळपते, सुशीलाबाई जळपते,ज्योती रामदास, नागणबाई तपासकर, जनाबाई जळपते, रेणुकाबाई जळपते, लक्ष्मीबाई जळबाजी, पंचफुलाबाई कराळे,पुजाबाई जळपते, शामराव जळपते,दिगांबर जळपते,अमोल संभाजी जळपते, उमेश जळपते,मारुती रेशमाजी, संजय दिगांबर, बसाजी जळपते, जळबाजी जळपते, पांडुरंग जळपते, मारोती संभाजी, संतोष गुरुजी, आडेलु जळपते, संदीप जळपते,आनंदा तपासकर, संभाजी जळपते,सोपान जळपते, मारुती जळपते,बबन जळपते, संकेत जळपते, विनोद कदम,पोचीराम कराळे, हिरामण जळपते, निलेश ऐरणकर, गणेश जळपते,विनोद कदम, विशाल वच्चेवार, प्रमोद जळपते, जयराम भालेराव,परमेश्वर जळपते, अमित पोतरे,संदीप जळपते आदी पोटा बु येथील समस्त समाज बांधव यावेळी रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाला होते.