नांदेड| अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेणाऱ्या युवकास माळाकोळी पोलीसांनी कर्नाटक राज्यातुन ताब्यात घेतेले आहे. पोलिसांनी सायबरच्या मध्यतीने तत्परतेने हि कार्यवाही केल्याने अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणाऱ्यांमध्ये एक प्रकारची धास्ती निर्माण झाली आहे.


पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी क्राईम मिटींगमध्ये अपहरण झालेले अल्पवयीन मुलींचा शोध घेणे बाबत मिशन निर्भया अतंर्गत सर्व ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस ठाणे माळाकोळी येथे दिनांक 09.07.2025 रोजी पिडीत मुलीच्या वडीलाने दिलेल्या फिर्यादी वरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयात पिडीत मुलीचा तांत्रीक मदतीचे सहाय्याने शोध घेतला असता ती कर्नाटक राज्यात असल्याची माहीती मिळाल्याने तात्काळ सदर गुन्हयाचे तपासीक अधिकारी पोउपनी गिरीश चामले हे पथकासह रवाना झाले.

सदर पथकाने गुन्हयातील पिडीत मुलगी व तिस फुसलावुन पळवुन नेणारा आरोपी नामे ओंमकार दत्ता मद्देवाड, वय 19 वर्षे व्यवसाय मजुरी रा. जिल्हा लातुर, यास तांत्रीक मदीतचे सहाय्याने शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस ठाणे माळाकोळी येथे हजर केले. सदर पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करुन तिचे नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले. आणि आरोपीस अटक करुन मा. न्यायालयात हजर करण्याची तजविज ठेऊन गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे. पोलीस ठाणे माळाकोळी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे कौतुक केले आहे.



