लोहा l नगर पालिका क्षेत्रातील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी पाठपुरावा करून ९कोटी ९० लक्षरुपये मंजूर करून आणले त्यामुळे तिन्ही टप्यातील लाभार्थ्यांना अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या चार महिण्याच्या २ कोटी ८३ लक्ष रुपये यापूर्वीच लाभार्थ्यांना मिळाले आणि आता प्रलंबित अनुदान पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरु झालीं आहे. पहिल्या टप्प्यातील घरकुलांचं निधी मिळणार आहे.


आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा शहराच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. पहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील ,माजी सभापती विठ्ठलराव पवार, व्यंकटराव मुकदम, माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, संभाजीराव धुतमल, लक्ष्मणराव हामदे, माणिकराव मुकदम, रामराव सूर्यवंशी यासह नागरी याचे नेहमीच सहकार्य मिळाले आहे. आता माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, केशवराव मुकदम, छत्रपती धुतमल ,दता वाले, करीम।शेख व निष्ठावंत सहकार्याची साथ मिळते आहे. शहरवासीयांनी सुध्दा त्यांना भक्कम साथ दिली आहे. पंतप्रधान आवास योजनेत पहिल्या टप्यात २०१८ मध्ये ७४६, दुसऱ्या टप्प्यात ९५०तर तिसऱ्या टप्प्यात २९६ असे एकूण १ हजार ९९२ घरकुल मंजूर झाले आहेत.

आ. चिखलीकरांमुळे ९ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी
लोहा शहरातील जनतेनी कठिण काळात नेहमीच प्रतापरावांना गंभीर साथ दिली आहे. या विधानसभा निवडणूकीत मोठा जातीवाद झाला .परिस्थिती प्रतिकूल असतानाही जनतेनी त्याची साथ सोडली नाही. शहरवासिय त्यांच्या पाठीशी खीरपणे उभे राहिले. घरकुल लाभार्थीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी मुख्याधिकारी -जिल्हाधिकारी – मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला गोरगरीब लाभार्थ्यांनी ज्या कष्टाने हक्काचे घर उभे केले त्यांना अनुदान मिळावे यासाठी प्रतापराव मदतीला धावून आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ९ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्याचा फायदा शहरातील ‘पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांना झाला आहे.

नव्याने काम सुरु करणाऱ्यांना तात्काळ एक लाख अनुदान टाकावे
पंतप्रधान आवास योजनेत ज्यांना बांधकाम परवानगी मिळाली आहे असा पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ बांधकाम सुरू करावे त्यांना आठ दिवसात पहिला एक लक्ष रुपयांचा हप्ता द्यावा. जेणे करून बांधकाम करण्यास मदत होईल अश्या सुचना आ चिखलीकर यांनी संबंधितांना दिल्या आहेत. तसेच ज्यांनी बांधकाम पूर्ण केले पण तांत्रिक त्रुटी असतील तर त्या दूर कराव्यात व अशा लाभार्थ्यांचे अनुदान टाकण्यात यावे. असे आ प्रतापराव पाटील यांनी सांगितले त्यांच्या पाठपुराव्या मुळे मोठा दिलासा घरकुल लाभार्थ्यांना मिळाला आहे.
