किनवट, परमेश्वर पेशवे| भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती असून त्यानिमित्त इस्लापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विधानसभा जिल्हा संयोजक गोविंद अंकुरवाड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जीवन चरित्रावर बोलत असताना एका सर्व सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय प्रवास बराच खडतर होता. जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास त्यांनी केला.
राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना राजकारणात शिखर गाठणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडेंनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. खेडोपाडी जात सर्वांना एकत्र करत भाजपची मोट बांधण्याचे काम प्रमोद महाजन यांच्यासोबत मिळून केले.
नंतर रवि कसबे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जिवन चरीत्रावर उजाळा दिला यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बालाजी आलेवार, काशिनाथ शिंदे, देविदास पळसपुरे, परमेश्वर पेशवे,सुर्यकांत बोधनकर, विकास माहूरकर, संदीप पाटील, शंकर मुंडे, शेख लतीफ, बालाजी दूरपडे,शिवाजी बोरकर,राज सोळंके,अतूल कोंकेवाड, प्रविण माहूरकर, गजानन कदम,ओम कदम राख सर व असंख्य गोपीनाथ मुंडे प्रेमी उपस्थित होते.