हदगाव | राज्य सरकारने लाडकी बहीन योजना जाहीर केल्याने पाञ असणा-या महीलांना दिड हजार रु मिळत असल्याने काही महीलांचे अर्ज ञुटी मध्ये असल्याने ती कागद पञे गोळा करण्यासाठी त्या महीला कागदपत्र करण्यात व्यस्त असल्याने शहरासह तालुक्यात शेती करिता शेतमजुर मिळणे कठीण झालेले आहे.
मिळालेल्या माहीती नुसार हदगाव तालुक्यात 42 हजारा पेक्षाजास्त महीलांनी लाडक्या बहीणा या योजने करिता अर्ज दाखल केल्याचे समजते या पैकी बहुसंख्य महीलांचे अर्ज ञुटी मध्ये आहे. अश्या ञुटी असलेल्या महीला ह्या कागद पञे काढण्यात व आधारलिंक नवीन पासबुक काढण्यातच व्यस्त झालेल्या आहेत. शेतक-याच्या शेतात पिकानानिदणी खत टाकणे शेतमजुर महीला मिळेनाशा झालेल्या आहे. प्रथम या योजनेअर्ज करण्याची मुदत 1जुलै 15जुलै पर्यत ठेवण्यात आली होती.
त्या नंतर आणखी सुधारणा करुन यांची मुदत 31 आगष्ट 2024 लाभर्थी महीलांना अर्ज करता येणार असल्याने व आता फक्त काही दिवसच शिल्लक राहील्याने ग्रामीण व शहरी भागातील महीलांची गर्दी तलाठी तहसिल कार्यालय मध्ये प्रचड प्रमाणात वाढतांना दिसुन येत आहे. आता काही महीलांच्या खात्यात तीन हजार आल्याने आणखीनच महीला मध्ये चुरस वाढलेली आहे. शेतीच्या दिवसा मध्येशेती कामे सोडुन कागदपञे गोळा करण्या मध्येचव्यस्त झाल्याचे दिसुन येत आहे. निंदणी खत देण्यासाठी शेतमजुर महीला मिळेनाशा झाल्या या मुळे शेतक-यची मोठी अडचण निर्माण झाल्याचे दिसु येत आहे. शेतकरी मजुराच्या शोधात दिसुन येत आहे.