नविन नांदेड l नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा अध्यक्षपदी किरण देशमुख,उपाध्यक्ष शाम जाधव, कार्याध्यक्ष रमेश ठाकूर यांच्या सह कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली.


नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल नवीन कार्यकारिणी निवडीसाठी 18 जानेवारी 26 रोजी सिडको येथील वृत्तपत्र विक्रेता टिनशेड येथे बैठक घेण्यात आली, यावेळी सर्वानुमते किरण देशमुख यांच्यी तर कार्याध्यक्ष पदी किरण देशमुख, उपाध्यक्षपदी शाम जाधव, कोषाध्यक्ष सारंग नेरलकर,सचिव निळकंठ वरळे, सहसचिव तिरूपती पाटील घोगरे यांच्यी निवड करण्यात आली,या नंतर
नुतून अध्यक्ष किरण देशमुख यांच्ये स्वागत करण्यात आले, यावेळी व्हाईस ऑफ मिडीयाचे मुख्य सचिव अनिल धमणे पाटील, नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष तुकाराम सावंत यांनी अभिनंदन केले.

नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध उपक्रम घेण्यात येणार असुन, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष किरण देशमुख यांनी सांगितले.



