किनवट,परमेश्वर पेशवे| कोठारी ते गोकुंदा रोडवर गस्त करताना सागवानाची तस्करी करणारा ऑटो पकडण्यात किनवट वन विभागाला यश आहे. परंतु सगवंतासकर आरोपी नेहमीप्रमाणे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत.
दिनांक 11 डिसेंबर रोजी 18.30 वाजेच्या दरम्यान कोठारी ते गोकुंदा रोडवर गस्त करत असताना विना नंबरचा संशयित ऑटो दिसल्यावरून पाठलाग करून थांबवून पकडण्याचा प्रयत्न केले असता ऑटो व सागी मुद्देमाल सोडून अंधाराचा फायदा घेऊन आरोपी फरार झाले. सदर घटनेचा आरोपी विरूध्द 09/2024 नुसार वनगुन्हा नोंद करून सागी नग-70 घ.मी.-0.4790 किंमत -10107=00,अंदाजे ऑटो किंमत-30,000=00 असे ऐकून मुद्देमाल किंमत 40,107=00 जप्त करण्यात आले.
ही कार्यवाही उपवनसंरक्षक केशव वाबळे नांदेड सहाय्यक वनसंरक्षक जी.डी. गिरी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक किनवट पी.एल.राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मा.वनपरीमंडळ अधिकारी चिखली एम. एन.कत्तूलवार वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक बालाजी झंपलवाड आर.बी. दांडेगावकर लिपिक मनोज गंगलवाड तसेच वाहन चालक बाळकृष्ण आवले, वनमजूर साहेबराव राठोड यांचा या कार्यवाहीत सहभागी होते.