किनवट, परमेश्वर पेशवे। दिनांक 24 रोजी राज्यात महाविकास आघाडीच्या वतीने कडकडीत बंद पुकारण्याचा इशारा देण्यात आला असून या बंद संदर्भात किनवट येथील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या कार्यालयात जाऊन किनवट कडकडीत बंद पाळण्या संदर्भात निवेदन दिले.


महाराष्ट्र राज्यात महिला शाळकरी मुली महाविद्यालयीन मुली तथा महिलावर होत असलेल्या अत्याचारांच्या बलात्कारांच्या घटनेच्या विरोधात महाराष्ट्रातील नागरिकाच्या सुरकक्षिततेबाबत महाराष्ट्र शासन हे सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप करत सरकारच्या या नाकर्तेपणाच्या धोरणा विरोधात महाविकास आघाडीत असलेल्या तीन पक्षाच्या सहयोगी पक्षाने किनवट बंदचा इशारा दिला.


या बंदमध्ये सर्व व्यापारी बंधूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेडी, शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मारोती दिवसे, काँग्रेस शहराध्यक्ष गिरीश नेमानीवार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जाहीरोद्दीनखान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रशांत कोरडे सह्याचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात दिले.
