नांदेड| पोलीस स्टेशन कंधार यांनी अवैध वाळू उपसा करुन चोरी करणाऱ्यांचा पाठलाग करून ताब्यात घेत टाटा कंपणीचे हायवा टिप्पर क्र.MH-04/एलक्यू-0295 किंमत 20,00,000 (वीस लाख रुपये) अंदाजे 05 ब्रास रेती किंमत 30,000 रुपये असा एकूण 20,30,000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीची अवैद्य रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अवैधरित्या वाळू उपसा करुन चोरी करणारे इसमांवर व वाहनांवर कार्यवाही करण्याचे आदेश पोनि चंद्रकांत जाधव, पोस्टे कंधार यांना दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन कंधार येथील पोनि चंद्रकांत जाधव, पोलीस पथक पोस्टे कंधार हद्दीत दिनांक 12.07.2025 रोजी रात्री पेट्रोलींग करीत असतांना लोहा येथुन मुखेडकडे एक हायवा टिप्पर वाळुची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने अवैध वाळू वाहतूक करीत आहे. अशी माहीती मिळाल्यावरुन सदर पोलीस पथक हे वाहने चेक करीत घोडज फाटा येथे थांबले


टिप्पर चालक यास पोलीसांनी थांबण्याचा इशारा केला असता तो न थांबता निघून गेला. त्याचा पाठलाग करुन सदर हायवा टिप्पर हा संगमवाडी शिवारात थांबवून चौकशी केली असता यातील आरोपीतांनी संगणमत करुन आत अंदाजे पाच ब्रास वाळु विना परवाना बेकायदेशिररित्या वाळुचो चोरटी वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. आरोपी आणि हायवा टिप्पर वाळुसह पंचा समक्ष जप्त करुन पोलीस स्टेशन कंधार येथे आणुन त्यांचे विरुध्द कायदेशिर कार्यवाही केली आहे. पोनि श्री चंद्रकांत जाधव, व पोलीस पथक पोस्टे कंधार यांनी अवैध रेतीचा टाटा कंपणीचा टिप्पर व पाच ब्रास रेती असा


एकुण 20,30,000/-रु चा मुद्देमाल जप्त करुन उत्कृष्ट कामगीरी केली आहे. पोलीस स्टेशन कंधार येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगीरी अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कंधार पोलीस पथकाचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.



