किनवट,परमेश्वर पेशवे। नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर हे लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथम निवडून आल्या नंतर पहिल्यांदाच किनवट आदिवासीबहुल भागाचा दौरा करत असताना प्रथम त्यांनी लाखो भावीकांचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास टेकडी येथे जाऊन प्रथम दर्शन घेतले तसेच येथिल परमपूज्य लिंबाजी महाराज यांचे दर्शन घेऊन चर्चा केली असता त्यांनी या तीर्थक्षेत्राचा विकासा बरोबर या भागात शेतकऱ्यांसाठी सिंचन तलावाची निर्मिती करून हा भाग सुजलाम सुफलम करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
यावर नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर की या भागातील शेतकरी नागरिक यांच्या समस्या जाणून घेऊन या भागातच सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांची बैठक येथे लावून काय समस्या आहे ते इथे सोडू असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. ज्यावेळेस मी प्रथम इथे दर्शनाला आलो तेव्हा माझ्या मनात लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती मी अनेक वेळा उद्धव साहेबांना म्हणालो की मी निवडणूक लढू शकत नाही असे सांगितले असतात मी दर्शन घेऊन पायरीला खाली टेकडीच्या उतरताच मला साहेबांचा फोन आला की तुम्हाला लोकसभेला निवडणुकीला उभे टाकावेच लागेल आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता मुंबईला निघा असे मला फोनवरून कळाले ही या कैलास टेकडीची देण आहे.
त्यासाठी तेलंगणा व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कैलास टेकडीचा कसा विकास साधता येईल त्याचबरोबर आदिवासी ग्रामीण भागातील वाड्या सह दुर्गम भागाचा विकास साधण्याचा सदैव प्रयत्न करीन अश्या स्वरूपाचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले . यावेळी शिवणी, सोनपेठ, कोसमेट ,इस्लापूर, या गावातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
या दौऱ्यानिमित्त शिवसैना उद्धव गटाचे तालुकाप्रमुख मारुती दिवसे पाटील, उपतालुकाप्रमुख अतुल दर्शनवाड. हिमायतनगर येथील तालुकाप्रमुख विठ्ठल ठाकरे, संपर्कप्रमुख सराटे, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते भुजंगराव पाटील , इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील संचालक राजेंद्र घोगरे पाटील अनुप देशमुख, सचिन पाटील,शेख जब्बार,माजी सरपंच देविदास पळसपुरे नारायण पाटील मलकजांब ,ऐरणा कौड, कोसमेट येथील माजी सरपंच शिवाजी बोटेवाड. श्याम साखरे, शिवसेनेचे किसान सेलचे तालुका प्रमुख सुमित पाटील कोल्हारीकर.शिवणी येथील सुर्यकांत सुर्यवंशी पाटील, बाळासाहेब देशमुख, उपसरपंच संतोष जाधव,शुभम देशमुख,नयन देशमुख,रोशन खान पठाण, संग्राम बिरकुले, सायन्ना पाटील.कमलबाई देशमुख, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाकलवाड, मनोज राठोड, सावन जयस्वाल, प्रशांत डांगे, नारायण शिनगारे, बाळू शेरे, डॉक्टर भगवान गंगासागर, प्रभाकर बोड्डेवार, शुभम पेशवे, लक्ष्मीबाई सुलभेवार, शम्माबाई पठाण, गणेश मोतेवार, लक्ष्मण बोरकर, प्रकाश पाटील, दत्ता गावंडे, साई बैलवाड, सोपान बैलवाड, श्याम बैनवाड, यांच्यासह असंख्य शिवसैनिक मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.