लोहा /माळाकोळी| विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसीच्या आरक्षणास धोका नाही तो खरा निवडणूक झाल्यानंतर आहे. त्यामुळे राज्याच्या विधानसभेत किमान शंभर आमदार ओबीसींचे निवडणूक जाणे गरजेचे आहे. मनोज जरांगेंच्या अवास्तव मागणींमुळे व दादागिरीच्या वागण्यामुळे ओबीसी समाज एकवटला आहे. त्याच्यात राजकीय जागृती झाली ही आनंदाची बाब आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.


ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे नांदेड जिल्ह्यात आगमन होताच माळेगाव यात्रा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. लोहा विधानसभा मतदार संघात वंचित “कडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केले .तसेच भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाच्या वतीने त्याचे जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यात आले. माळाकोळी येथे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्त आयोजित ओबीसी मेळाव्यास ऍड प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केले.वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकुर, नांदेड जिल्हा प्रभारी सर्वजीत बनसोडे,ऍड अविनाश भोसीकर,आयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, अजय बारस्कर, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, इच्छुक उमेदवार संजय पवार, डॉ केंद्रे, माजी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष प्रमोद धुतमल, भाबौम सभेचे जिल्हाध्यक्ष पी एम वाघमारे माधव मुसळे, माऊली गिते, केशव तिडके सरपंच जनार्धन तिडके, बापूसाहेब कापुरे रत्नाकर महाबळे, माजी प स सदस्य उत्तम चव्हाण यासह मोठ्या संख्येने ओबीसी -वंचित पदाधिकारी उपस्थित होते.



ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनीं मनोज जरांगे यांच्या अवास्तव मागणी वर टीका केली. ओबीसी च्या हक्कावर गदा आल्यावर मागील अनेक वर्षात झाले नाही ते आता होत आहे. ओबीसीत राजकीय जागृती निर्माण झाली आहे, ही आनंदाची बाब आहे. यापुढे ओबीसींना नेते तयार करावी लागतील, विधानसभा निवडणुकीच्या पुर्वी ओबीसी आरक्षणाला धोका नसुन विधानसभा निवडणूकीनंतर खरा धोका आहे. म्हणून निवडणुकीनंतर विधानसभेत ओबीसींचे १०० आमदार निवडून येणे आवश्यक आहेत. राज्यात १६९ श्रीमंत मराठा घराणे आलटुन पालटुन सत्तेत असतात. यांच नात्यागोत्याच राजकारण आहे, गरीब मराठा समाजाचा खरा लढा ओबीसी समाजाशी नसुन या श्रीमंत मराठ्यांशी आहे असेही ते यावेळी म्हणाले.



ओबीसींच नेतृत्व राज्यात फक्त गोपीनाथराव मुंडे यांनीच केले आहे, त्यांच्यानंतर ओबीसींना सर्वमान्य नेता मिळाला नसल्याचे ऍड प्रकाशजी यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकुर, अविनाश भोसीकर, सर्वजीत बनसोडे, आयोजक चंद्रसेन पाटील, शिवा नरंगले माऊली गिते यांची भाषणे झाली. लोह्यात आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आले. मोटार सायकल रॅली काढण्यात आली माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी भला मोठा खारीक खोबऱ्याचा हार क्रेन द्वारे खालून स्वागत केले डॉ केंद्रे, दता शेटे, हरिहर शेटे, मटके,आनेराव यांनी स्वागत केले शहरात स्वागताला समाज बांधवासह मोठी गर्दी झाली होती

आम्ही वेगळे लढलो म्हणून पराभुत…
लोकसभा निवडणुकांमध्ये ,आपण स्वतः पंकजा मुंडे, महादेव जानकर आम्ही स्वतंत्र लढलो म्हणून पराभूत झालो. आम्ही एकत्र लढलो असतो चित्र वेगळे राहिले असते. अशी खंत व्यक्त करत आगामी नव्या राजकीय समिकरणाला साद घातली आहे.


