Ad Prakash Ambedkar | विधानसभेत ओबीसीचे शंभर आमदार निवडून येणे गरजेचे – ऍड प्रकाश आंबेडकर – NNL
लोहा /माळाकोळी| विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसीच्या आरक्षणास धोका नाही तो खरा निवडणूक झाल्यानंतर आहे. त्यामुळे राज्याच्या विधानसभेत किमान शंभर आमदार ओबीसींचे निवडणूक जाणे गरजेचे आहे. मनोज जरांगेंच्या अवास्तव मागणींमुळे व दादागिरीच्या वागण्यामुळे ओबीसी समाज एकवटला आहे. त्याच्यात राजकीय जागृती झाली ही आनंदाची बाब आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे नांदेड जिल्ह्यात आगमन होताच माळेगाव यात्रा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. लोहा विधानसभा मतदार संघात वंचित "कडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केले .तसेच भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाच्या वतीने त्याचे जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यात आले. माळाकोळी येथे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्त आयोजित ओबीसी मेळाव्यास ऍड प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केले.वंच...
