उमरखेड,अरविंद ओझलवार। देशी बनावटीचे पिस्तूल सह जिवंत काडतुस बाळगणाऱ्या इसमास पोफाळी पोलिसांनी अटक केल्याची घटना काल दि ११ जुन सायंकाळी सहा वाजता शिळोना गावाजवळ घडली .शहरी भागात पिस्टल सापडण्याच्या घटना घडतात परंतु आता ग्रामीण भागात पिस्तूल मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे .
शेख सोहेल शेख खाजा वय 24 रा मधुकर नगर पुसद असे पिस्तूल मिळून आलेल्या युवकाचे नाव असून पोफाळी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम देशी पिस्तुलासह फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोफाळी पोलीस पथकाने माहितीच्या आधारे सापळा लावला असता उमरखेड पुसद रोडवर शिळोणा गावाच्या समोर संशयितरित्या फिरताना मिळून आला.
पोलीस पथकाने सीताफिने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देसी पिस्तूल व दोन जिवंत काडतुस आढळून आले पिस्तूलच्या परवाना बाबत विचारले असता कोणताही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले .अवैधरित्या पिस्तूल बाळगत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे मॅक्झिन्सह पिस्तूल व दोन जिवंत काडतोस असा एकूण 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर आरोपीने पिस्तूल व काडतूस कोठून आणले व त्याचा वापर कशासाठी करणार होता याबाबत पोलीस तपास करीत आहेत. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड , स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोफाळीचे ठाणेदार पंकज दाभाडे , पो हे कॉ ज्ञानेश्वर मस्के , हर्षद पंडितकर , हिम्मत बडंगर यांनी पार पाडली.