नांदेड| विक्रमी चोवीस वेळा अमरनाथ चे दर्शन घेतलेले धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी यावर्षी अमरनाथची गुहा तयार करून त्यामध्ये महालक्ष्मी च्या स्थापना करण्यात आल्या असल्यामुळे या सुंदर देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण गौरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणारे दिलीप ठाकूर यांनी यावर्षी त्यांच्या शिवशक्ती नगर, मील रोड, नांदेड येथील निवासस्थानी अमरनाथ ची गुहा तयार केली आहे.अमरनाथ ला ज्याप्रमाणे गुहा आहे त्याप्रमाणे हुबेहूब देखावा तयार करण्यात आला आहे.या गुहेत बाबा बर्फानीची देखणी पिंड, कबूतरे, त्रिशूल,डमरू, भगवा झेंडा च्या प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी श्री च्या पाचशे पेक्षा मुर्त्या ठेवण्यात आलेले आहे.
एक दुसऱ्याशी किंचितही साम्य नसणाऱ्या या मुर्त्या पाहण्यासाठी दरवर्षी शेकडो महिला गणेशोत्सवा दरम्यान दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी येतात. अमरनाथ ची गुहा तयार करण्यासाठी बाबुराव नारळे , संतोष भारती यांना तब्बल ४८ तास लागले. गुहेमध्ये महालक्ष्मीची सजावट माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, नेहा राजपूत, नंदा चौहान, लीना ठाकूर, सुनंदा लिंगमपल्ले, सुनिता ठाकूर, शोभा चौहान, बिना ठाकूर यांनी केली आहे. गुरुवार दि.१२ रोजी दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत हा देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व महिलांना ठाकूर परिवारातर्फे आकर्षक पेन भेट देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी अमरनाथ चा देखावा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन सौ. जयश्री दिलीपसिंह ठाकूर यांनी केले आहे.