HomeनांदेडCIDCO ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय पाठीमागील मुख्य रोडवर असलेल्या शंकरनगर मार्गावर...

CIDCO ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय पाठीमागील मुख्य रोडवर असलेल्या शंकरनगर मार्गावर पथदिवे बसवा – NNL

नवीन नांदेड़ l मनपाच्या सिडको क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत असलेल्या मुख्य रोडवरील मागील बाजूस असलेल्या शंकरनगर मार्गावर पथदिवे बसवून देण्याची मागणी अभियंता महावितरण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख पप्पू गायकवाड़ यांनी प्रत्यक्ष भेटून केली आहे.

अभियंता महावितरण यांना दिलेल्या निवेदनात सिडको मुख्य रस्ता व क्षेत्रीय कार्यालय मागील मार्गावर पथदिवे यांची कमतरता असून त्यामुळे रात्रीच्या वेळी ये-जा करताना अडी अडचणींचा सामना करावा लागतो.

याशिवाय या मार्गावर चोरीच्या घटना वाढल्या असून प्रभागात पथदिवे लवकरात लवकर बसवावे व सिडको मुख्य रस्ता झाल्यानंतर आज पर्यंत या रस्त्यावर पथदिवे बसविण्यात आले नाहीत , लवकर बसवावेत जेणे करून कोणताही अनुचित प्रकार या मार्गावर घडू नये, असे निवेदनात नमूद केले यावेळी शिवसेना सर्कल प्रमुख सूर्यकांत शिंदे ,बालाजी वाघमारे, आनंदा वाघमारे, दीपक गर्दनमारे यांची उपस्थिति होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments