हिमायतनगर| येथील तहसील, पोलीस ठाणे, नगरपंचायतसह शहर व ग्रामीण भागातील सर्वच शासकीय- निमशासकीय कार्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तिरंगा ध्वज फडकवून जल्लोषपूर्ण वातावरणात भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
हिमायतनगर शहरातील दिवाणी न्यायालयात न्यायाधीश श्री किरणकुमार खोंद्रे यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. शहरातील पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षक अमोल भगत यांच्या हस्ते सकाळी ७.०५ वाजता तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. यावेळी शहरातील अनेक मान्यवर, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, पत्रकार व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती जनार्धन ताडेवाड यांच्या हस्ते.
ग्रामीण रुग्नालयात वैद्यकीय अधीक्षक श्री जाधव यांच्या हस्ते आणि शहरातील प्रमुख तहसील कार्यालयात तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवर, नागरिक, कर्मचारी यांनी मोठ्या संखेने उपस्थित होऊन तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली. आणि एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शहरासह तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा, खाजगी शाळा, कॉलेज, महाविद्यालय, बैंका, संस्था, यासह अनेक ठिकाणी हर्षेउल्हासात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी चिमुकल्या बालकांनी हाती तिरंगा ध्वज घेऊन शहरातील मुख्य रत्स्याने प्रभातफेरी काढून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.