नवीन नांदेड l नांदेड तालुक्यातील गुंडेगाव येथे पांदन रस्ता कामाचा शुभारंभ तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते करण्यात आला यामुळे गावातील जवळपास एकशे पन्नास शेतकऱ्यांना व अंत्यविधीसाठी स्मशानभूमी ला जाणाऱ्या ग्रामस्थ सोय होणार आहे.


महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसीय उपक्रम अंतर्गत नांदेड तहसिल कार्यालय यांच्या वतीने पांदण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ गुंडेगाव ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत पांदण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 11 एप्रिल रोजी करण्यात आला.


यावेळी तहसिलदार संजय वारकड,मंडळ अधिकारी अनिल धुळगंडे, तलाठी अंजुषा पवार, सरपंच लक्ष्मी बाई बबनराव हंबर्डे, माजी सरपंच दासरवाड हंबर्डे पोलीस पाटील पांडुरंग हंबर्डे , यांच्या सह जेष्ठ नागरिक दतराम हंबर्डे, बालाजी हंबर्डे,प्रताप हंबर्डे, नामदेव हंबर्डे,नारायण हंबर्डे, लक्ष्मण घोगरे,देवराव हंबर्डे,श्रीपती हंबर्डे, रामराव हंबर्डे,नागोराव हंबर्डे, माधवराव हंबर्डे,संदीप हंबर्डे, ऊतम हंबर्डे, गणेश हंबर्डे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष समाधान हंबर्डे, चंद्रभान कुरे,ऊतम कुरे, सुर्य भान कुरे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.
सदरील पांदण रस्त्या मुळे गावातील जवळपास एकशे पन्नास शेतकरी यांना शेतीला जाण्यासाठी व शेतातील माल ने आण करण्यासाठी व स्मशानभूमीला जाण्यासाठी फायदा होणार आहे.
