नांदेड| नांदेड शहरातील विद्यार्थीवर्गास शालेय पुस्तके व अन्य लागणारे शालोपयोगी साहित्य सहजतेने व जवळच उपलब्ध व्हावे या हेतुने आय आयबीच्या समोर, भाग्यनगर – यशवंत कॉलेज रोडवर, शामनगर, नांदेड येथे ओम बुक सेंटरच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन नुकतेच थाटात संपन्न झाले.


नांदेड शहरातील पुस्तकाचे अग्रगण्य आणि प्रसिद्ध असणारे आनंदनगरमधील ओम बुक सेंटर अँड एजन्सीच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन आयआयबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दशरथ पाटील, संतोष पाटील, विराज सर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. कोकरे, विभाग प्रचारक आत्मारामजी बावस्कर आणि संपूर्ण आय. आय. बी. टीमच्या हस्ते अतिशय उत्साहात झाले.


प्रारंभी या मान्यवरांचे ओम बुक सेंटरचे प्रमुख मारोती कमळापुरे यांनी स्वागत केले. याप्रसंगी आजपर्यंतचे ग्राहक, शैक्षणिक सेवेतील शिक्षक, क्लासेस, हॉस्टेलची सर्व मंडळी, संघ परिवारातील सर्व कार्यकर्ते व स्वयंसेवक, डॉक्टर्स, व्यावसायिक, वकील असे सर्व क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचाल डॉ. मन्मथ डामरंचे यांनी केले. या शाखेमुळे विद्यार्थी व पालकवर्गात आनंद व्यक्त होत आहे.




