नांदेड| आगामी लोकसभा पोट निवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे अनुषंगाने नांदेड जिल्हयातील गुन्हे अभिलेखावरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपीची यादी तयार करुन, आरोपी विरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाचे आदेश अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते. त्यावरून शेख जुबेर शेख खदीर वय 20 वर्ष व्यवसाय मजुरी रा. मुदखेड रोड, वाजेगाव ता. जि. नांदेड यास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे.
नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेदाराकडून गुन्हेगाराना स्थानबध्द करण्यासंबंधाने MPDA प्रस्तावाची कार्यवाही वालु आहे. MPDA अंतर्गत 22 आरोपीतांना कारागृहामध्ये ” स्थानबध्द” करण्यात आले आहे. तसेच लोकसभा पोट निवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे पार्श्वभुमीवर गुन्हेगारांची यादी तयार करुन, त्यांना स्थानबध्द करण्याची प्रकीया चालू करण्यात आली आहे.
पोलीस ठाणे नांदेड ग्रामिण यांचेकडून सराईत गुन्हेगार नामे शेख जुबेर शेख खदीर वय 20 वर्ष व्यवसाय मजुरी रा. मुदखेड रोड, वाजेगाव ता. जि. नांदेड या आरोपी विरुध्द खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, हत्यार बाळगणे व त्याचा वापर करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे व दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने त्याचे विरुध्द एम. पी. डी. ए. अधिनियमाप्रमाणे स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे सादर करण्यात आला होता.
अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर MPDA प्रस्तावमधील आरोपीस एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याबाबतची शिफारस मा. जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे केली होती. त्यावरुन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी सदर प्रस्तावातील गुन्हेगार हा धोकादायक व्यक्ती सिध्द झाल्याने आरोपी नामे शेख जुबेर शेख खदीर वय 20 वर्ष व्यवसाय मजुरी रा. मुदखेड रोड, वाजेगाव ता. जि. नांदेड यास एक वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचे आदेश पारीत केले आहेत. त्या आदेशाप्रमाणे सदर आरोपीस मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे. यापुर्वी नांदेड जिल्हयातील 21 गुन्हेगाराना MPDA कायद्या अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द केले होते, आता ती संख्या 22 झाली आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली सुशिलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा, नांदेड श्री. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, पो. स्टे. नांदेड ग्रामिण यांनी आरोपीस स्थानबध्द करण्यासाठी कामकाज केले आहे.