हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील मुख्यप्रवेश रोडवरील प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत असल्याने पदचा-याना व वाहनधारकांना रोडवरुन चालणे म्हणजे मृत्यला आमञण दिल्या सारखे झाले आहे. विशेष म्हणजे हदगाव शहरात मुख्यप्रवेश रोड एकच आहे.
गेल्या ५० वर्षात आता पर्यत कोणत्या ही नगराध्यक्ष किवा आमदार खासदार या बाबतीत गार्भियन लक्ष घातलेले नाही. जर शहराच्या मुख्यप्रवेश रोडची अशी आवस्था असेल तर शहरातील रोडची काय…? परिस्थिती आसेल. शहरात एखादे वाहन जाण्यापुरत रोड जरी असले तरी पुढील वाहनाला जाण्यासाठी रोडच नाही अनेक महाभागानी सरकारी रोडवरच अतिक्रमण केलेले आहे. जर ऐखादी आप्रिय घटना घडली आग्निशमन वाहनाला जाण्यासाठी तितक्या रुदीचा रोड पण नाही ही वस्तुस्थिती आहे. शहरातील उमरखेड टी पाईट पासुन जुने बस्थानक तसे राठी चौक ते आझाद चौक या रोडवर प्रचंड प्रमाणात आतिक्रमण झालेले आहे.
यामुळे वाहतुक व्यवस्था कोलमडून पडलेली आहे. याकडे न.पा.प्रशासन किवा पोलिसाच काहीच लक्ष दिसुन येत नाही बस्थानकाच्या परिसरात दोन्ही बाजुनी व्यावसायिकांनी पाच ते सातफुट पर्यत अतिक्रमण करुन पक्के बाधकाम केलेले आहे. यामुळे मुख्य रोड अरुद झालेल आहे जर जडवाहने शहरात येतात. या अरुद रोडमुळे पदचा-याना व वाहनधारकाना नाहक ञास सहन करावा लागत आहे. अणखी विशेष म्हणजे शहरातील रौडवर कुठेही वाहने उभे करत असल्याने गंभीर घटना किवा आपघाताची शक्यता निर्माण झालेली दिसुन येत आहे. न.पा. सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाचे समन्वय दिसून येत नाही.
या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, तो अतिक्रमण ज्या मुख्य रोडवर आहे. तो भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच असून, त्यांनी आम्हाला जर सूचना केली तर आम्ही लगेच पूर्ण सहकार्य करू असं मुख्याधिकारी यांनी सांगितले.