Raksha Bandhan ; रक्षा बंधानानिमित्य विविध राख्या सिडकोच्या बाजार पेठेत दाखल

नवीन नांदेड l सिडको हडको परिसरातील बाजार पेठेत नारळी पौर्णिमा रक्षाबंधान सणांचा निमित्ताने विविध राख्या अनेक व्यापाऱ्यांनी सयारा, पुष्पा ,विराट,राधा, कृष्ण,ओम स्वास्तीक,महाकाल,मैरे भैय्या, गणपती कमल,एपप्ल,मोटू पतलु यासह विविध आकर्षक अशा राखी महाराष्ट्र राज्यातील मुंबई पुण्यासह, गुजरात मधील सुरत ,अहमदाबाद येथून आकर्षक व नवीन स्वरूपातील विविध कलाकृती असलेल्या राख्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्याने बाजार पेठेत महिलांसह युवतींची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे.


नारळी पौर्णिमा रक्षा बंधन निमित्य सिडको सिडको हडको परिसरातील बाजार पेठेत अनेक आकर्षक अशी दुकानांची सजावट करण्यात आली आहे रक्षा बंधन निमित्ताने अनेक कलाकृतीतून नवीन स्वरूपातील तिरंगा राखी, कुंदन, मारवाड़ी ,रेशीम, सोनेरी ,कोल्हापुरी चांदीची, रुद्राक्ष तर लहान मुलांसाठी ,बेनटेन ,कार्टून, म्यूजिकल ,लाईट, गोंडा,अशा अनेक प्रकारच्या राख्या बाजार पेठेत महाराष्ट्र,गुजरात ,हैद्राबाद या राज्यातील अनेक जिल्ह्यातून आणल्या आहेत ,विशेषता मेरे भैय्या ,पारंपरिक राख्या गोंडा यासह चांदीच्या व अन्य आकर्षक राख्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्यामुळे महिलांसह मुलीनी खरेदी साठी गर्दी केली आहे ,तर सराफा बाजारपेठ मध्ये सोन्या चांदीच्या दुकानात ही चांदीच्या आकर्षक असलेल्या राख्या विक्रीसाठी आल्या आहेत.

या वर्षी प्रथमच सिडको भागात इकोफ्रेंडली ,बांबु ,गायीचा शेणापासून कागदा पासून हाताने आकर्षक बनविलेल्या राख्या बाजारात आल्या असून चिनचा राख्या बाजारातुन हद्दपार झाल्या आहेत. सिडको हडको परिसरातील बाजार पेठेत राख्या खरेदी करण्यासाठी गर्दी झाल्याचे पाहावयास मिळत आहे.





