नवीन नांदेड़ l गुरुपौर्णिमे निमित्त इनरव्हील क्लब नांदेड तर्फे निवासी अंध विद्यालय वसरणी येथील मुख्याध्यापक शिक्षक कर्मचाऱ्यांचा आदर्श गुरु म्हणून 10जुलै रोजी सत्कार करण्यात आला.
निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड येथे इनरव्हील क्लब नांदेड वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरु गौरव सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद नांदेड च्या माजी अध्यक्ष सौं.मंगाराणी अमुलगेकर तर प्रमुख अतिथी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या माजी महापौर सौ जयश्री पावडे ताई या होत्या इनरव्हील क्लब नांदेडच्या अध्यक्ष सौ मीनाक्षीताई पाटील व सचिव डॉक्टर विद्या पाटील यांनी निवासी अंध विद्यालय वसरणी या शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा गुरु गौरव म्हणून सन्मानित करण्यात आलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बाबाराव इबितवार यांनी शाळेची माहिती आपल्या प्रस्ताविके मध्ये मांडली तसेच अंध विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.


देशभक्तीपर गीत गवळणी अभंग गाऊन पाहुण्यांचा आनंद द्विगुणित केला यावेळी अंध फुलांच्या अनेक उपक्रम पाहून मुलांची गुणवत्ता बघूनइ जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष तथा समाज कल्याण च्या माजी सभापती सौ.मंगाराणी यांनी शाळेचे विविध उपक्रम पाहून तसेच अंध विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघून शाळेची प्रशंसा केली व समाधान व्यक्त केले इनरव्हील क्लब नांदेड महिला सामाजिक संस्थे तर्फे मुख्याध्यापक यांना शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला ,यावेळी शाळेचे शिक्षक पंकज शिरभाते,रामराव जोजार ,संजय पाटील,वसुधा निकम. भास्कर अनेराये ,सुरेश होळंबे,मनोज कलवले ,नामदेव इंगळे ,अक्षय बलभीम केंद्रे आदी कर्मचाऱ्यांचे यावेळी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.




