देगलूर, गंगाधर मठवाले| मुखेडकडे जाणाऱ्या एकलारा जाणाऱ्या केरुर पर्यंतचा रस्ता मागील दहा (१०) वर्षांपासून सदरील रस्ता अतिशय खराब, जीवघेणा, यमदूत मार्ग झाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गावकऱ्यांना मुखेड, देगलूर आदी शहरासह आसपास शासकीय, निमशासकीय, सगेसोयरे, मित्रपरिवार, नातेवाईक, सुख, दुःखात , दवाखान्यात उपचारासाठी रूग्णांना, प्रसुती बाळंतपणसाठी जीवघेणा ठरलाय सदरील रस्त्यावरुन वाहतूक करताना. दुचाकी स्वार, ऑटो , चारचाकी वाहनांना अनेक अपघाताचा सामना करावा लागतो अनेकदा अपघात होऊन जखमी होऊन अपंगत्व झाले आहेत तर अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत.


या संदर्भात अनेक वेळा मंत्री, लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी यांना वारंवार भेटून, अर्ज, निवेदन, विनंत्या करूनही सदरील रस्त्याचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू होण्याच्या दिसत नाहीत त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने दि.९ जुलै रोजी सकाळी १० ते 1वाजे पर्यत एकलार येथे शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री बबनराव बारसे यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेनेच्या वरिष्ठांच्या व ब्राह्मणांच्या ,जनतेच्या उपस्थितीत शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रोच्चारात ” 51 पदाधिकाऱ्यांनी होमहवन” एक अनोखे आंदोलनात सहभाग घेतला.


ईश्वरचरणी प्रार्थना करीत सदरील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची सुबुद्धी देवो अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी सहसंपर्कप्रमुख भागवत जाधव, उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, नांदेडचे तालुका प्रमुख सुनिल पाटील कदम, मुखेडचे तालुका प्रमुख उमेश पाटील आडलूरकर,नांदेड शहर संघटक पिन्टु सोनपे,मुखेड विधानसभा मतदारसंघ प्रमुख मन्मथ खंकरे मुक्रामाबादकर, मुखेड शहर प्रमुख शंकर चिंतमवाड, विधानसभा संघटक शंकर पिटलेवाड, युवा सेना तालुका प्रमुख बालाजी पाटील किटशेव, योगेश मामीलवाड, देगलूर युवा सेना तालुका प्रमुख तथा सोशल मीडिया तालुका प्रमुख भागवत पाटील सोमुरकर,



देगलूरचे सामाजिक कार्यकर्ते, धनाजी जोशी, शिवाजी सोनकांबळे मुजळगेकर, विधानसभा समन्वयक सौ सुनिताबाई वडजे, उपतालुकाप्रमुख विजय मंगलगे,,शिवराज भुरे, जब्बार शेख आदीसह शेतकरी शेतमजूर शिवसैनिक, युवा सैनिक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांना रस्ता संदर्भात जिल्हा प्रमुख बबनराव बारसे यांच्या हस्ते निवेदन देण्यात यावे यावेळी पोलिस उपनिरीक्षक फड यांच्या सह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. याप्रसंगी जिल्हा प्रमुख बबनराव बारसे सहसंपर्कप्रमुख भागवत जाधव, उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर, मुखेड तालुका प्रमुख उमेश पाटील आडलूरकर आदींची भाषणे झाली या अनोख्या आंदोलनाचे आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख उमेश पाटील आडलूरकर यांनी यशस्वी पार पाडले.


