नांदेड l प्रत्येक विद्यार्थ्याला वैज्ञानिक दृष्टीसह सामाजिक शिक्षणही मिळावे म्हणून सातत्याने पुढाकार घेणाऱ्या होली सिटी पब्लिक स्कूलने आणखी एक पाऊल टाकत अंतराळ यानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांची सहल गुरुवारी बेंगलोर येथील इस्रोकडे रवाना झाली असून येथील आणखी महत्त्वाचे व ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे विद्यार्थ्यांच्या जीवनात उपयोगी पडण्याच्या दृष्टीने दाखवली जाणार असल्याची माहिती प्राचार्य मोहम्मद अर्षद सर यांनी दिली असून बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली हि सहल रवाना झाली आहे.


होली सिटी पब्लिक स्कूल पासदगाव येथे असून शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह स्पर्धा परीक्षा, वैज्ञानिक व शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने परिश्रम घेतले जातात. त्यातील एक भाग म्हणून गुरुवारी इस्रो येथील अंतराळ यानाच्या माहितीसाठी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची सहल रवाना झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. किरण चिद्रावार सचिव बालाजी उत्तरवार, प्राचार्य मोहम्मद अर्षद यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल रवाना झाली आहे.

ओलंपियाड, चित्रकला, वैज्ञानिक स्पर्धेसह विविध पुरस्कार मिळवणारी कु. मीमांसा पाडमुख यांच्यासह 8 विद्यार्थिनी व 15 विद्यार्थी या सहलीमध्ये सहभागी झाले आहेत. शैक्षणिक शैक्षणिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे बाळासाहेब पवार व उपप्राचार्य सुजाता नाईक कुलकर्णी हे या सहलीचे नेतृत्व करत आहेत.



