हिमायतनगर, अनिल मादसवार| सर्वदूर ख्यातीप्राप्त असलेल्या हिमायतनगर (वाढोणा–वारणावती) येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या 2026 च्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या नियोजनासाठी दिनांक 01 जानेवारी, गुरुवारी दुपारी 2 वाजता मंदिर सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ शेतकरी विठ्ठलराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत यात्रा सब कमिटीच्या अध्यक्षपदी सुभाष शिंदे, उपाध्यक्षपदी विठ्ठलराव चव्हाण व विठ्ठल ठाकरे, तर सचिवपदी अनिल भोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शन व युवकांच्या पुढाकारातून श्री परमेश्वराची महाशिवरात्री यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. संपूर्ण भारतात एकमेव उभी श्री परमेश्वर मूर्ती नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) येथे असल्याने राज्यासह विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक येथून लाखो भाविक महाशिवरात्री निमित्ताने दर्शनासाठी दाखल होतात. यावर्षीची महाशिवरात्री यात्रा दि.13 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून दि.01 मार्च 2026 रोजी सत्कार सोहळ्याने समारोप करण्यात येणार आहे. यात्रा काळात भाविक-भक्त, व्यापारी, कलावंत, खेळाडू, भजनी मंडळ व यात्रेकरूंना येणाऱ्या अडचणी, तसेच भव्य शंकरपट स्पर्धा व इतर कार्यक्रमांचे नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली.

सप्ताह काळात ज्ञानेश्वरी व वीणा पारायण, काकडा आरती, हरिपाठ, अखंड हरिनाम, किर्तन, प्रवचने असे भव्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व शेतकरी वर्गासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कबड्डी स्पर्धा, भव्य कुस्त्यांची दंगल, भजन, शंकरपट, पशुप्रदर्शन, महिला व मनोरंजनात्मक स्पर्धांचा समावेश राहणार आहे.



यात्रेत यशस्वी ठरणाऱ्या संघ, खेळाडू, शालेय स्पर्धा विजेते व सहभागींस बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध उपसमित्या नेमण्यात आल्या असून जबाबदाऱ्या संबंधित पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्या आहेत. तसेच भाविकांच्या सोयी-सुविधा, दर्शन व्यवस्था, महाप्रसाद वितरण व सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष नियोजन करण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी विठ्ठलराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न मंदिर कमेटी उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक राजाराम झरेवाड, वामनराव बनसोडे, ऍड दिलीप राठोड, मथुराबाई भोयर, अनिल मदसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, नगराध्यक्ष रफिक सेठ, नगरसेवक विठ्ठल ठाकरे, गजानन गुंडेवार, सुभाष बल्पेलवाड, सरदार खान, भारत डाके, झिशान मिरझा, कलीम अब्दुल सलाम, फेरोज खान पठाण, शेख इलियास शेख कलाम, मेंडके, माजी जी. प. सदस्य समद खान, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, यात्रा कमेटी उपाध्यक्ष सुभाष शिंदे, रामराव सूर्यवंशी, गणेश शिंदे, मायंबा होळकर, संतोष गाजेवार, ज्ञानेश्वर शिंदे, श्याम पाटील, बाबुराव पालवे, प्रवीण कोमावार, राम नरवाडे, शिवसेना शहरप्रमुख प्रकाश रामदिनवार, शिवसेना शहराध्यक्ष गजानन हार्डफकर.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट तालुकाध्यक्ष वामनराव मीराशे पाटील, पांडुरंग तुपतेवार,भाऊराव वानखेडे, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन चायल, उदय देशपांडे, रामभाऊ सूर्यवंशी, मारोती हेंद्रे, संतोष वानखेडे, संतोष मुद्देवाड, तुकाराम मेरगेवाड, पंडित ढोणे, प्रवीण मामीडवार, गोविंद शिंदे, अमोल धुमाळे, सितू सेवनकर, विकास नरवाडे, निकु ठाकूर, विपुल दंडेवाड, पापा पार्डीकर, साहेबराव चव्हाण, श्याम जक्कलवाड, बंडू अनगुलवार, सतीश सोमसेटवार, साहेबराव अष्टकर, रामेश्वर पेटपल्लेवार, विशाल जाधव, बालाजी ढोणे, गोपीनाथ डोईफोडे, पवन गुंडेवार,लिपिक बाबुराव भोयर गुरुजी, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड अशोक अनगूलवार, मनोज पाटील, असद मौलाना, मन्नान भाई, नागेश शिंदे, परमेश्वर काळे, देवानंद गुंडेकर, सुभाष गुंडेकर, अनिल नाईक, आदिसह शहरातील नागरिक, युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
