HomeनांदेडInvestigate the building repair work : हिमायतनगर हदगाव पंचायत समिती इमारत दुरुस्तीच्या...

Investigate the building repair work : हिमायतनगर हदगाव पंचायत समिती इमारत दुरुस्तीच्या कामाची दक्षता व गुण नियंत्रण मंडळ पथकामार्फत चौकशी करा

नांदेड, अनिल मादसवार| पंचायत समिती हिमायतनगर व पंचायत समिती हदगांव जि. नांदेड येथील प्रशासकीय ईमारत दुरुस्तीचे होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे केले जातत आहे. या कामाची दक्षता व गुण नियंत्रण मंडळ पथकामार्फत चौकशी करुन संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता यांची खातेनिहाय व मालमत्तेची चौकशी व सदरचे काम करणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनी व एजन्सीवर दंडात्मक कार्यवाही करावी आणि त्या एजन्सीचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करावे अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्याकडे बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली असल्याने नांदेड जिल्हा परिषदेच्या देखरेखीत चालणाऱ्या पंचायत समिती अंतर्गत होत असलेल्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा बांधकाम उपविभाग हदगांव जि. नांदेड कार्यालयाकडून पंचायत समिती हदगाव व पंचायत समिती हिमायतनगर येथील ईमारतिच्या दुरुस्तीचे बांधकाम व फर्निचरचे चालू सुरु असून पुट्टी, सिलीग व फर्निचचे कामे निकृष्ट व बोगस होत असून, त्यामध्ये टाईल्स फरशी, लोखंडी ग्रील, खिडकी, स्लाईड खिडकी, कर्मचारी करीता डेक्स फर्निचर, प्लायवुडचे दरवाजे ही कामे अतिशय निकृष्ट व बोगस होताना दिसून येत आहेत. सदर कामे बोगस व निकृष्ट दर्जाचे करुन मार्च एण्डला बिलेही उचलली गेली आहेत.

२५/१५ ००५३-३१ पंचायत राज सहाय्यता अनुदान या हेडखाली हिमायतनगर व हदगाव पंचायत समिती इमारत दुरुस्तीचे बांधकाम करण्यात येत आहे. या संदर्भात तक्रारकर्ते यांनी माहितीच्या अधिकाराखाली जिल्हा परिषद बांधकाम विभाग भोकर यांच्याकडे पंचायत समिती हिमायतनगर व हदगांव ईमारत दुरुस्ती कामाचे प्रशासकीय आदेश मागितले असता संबंधितांकडून देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. त्यानंतर बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष तथा तक्रारकर्ते त्रीरत्नकुमार भवरे यांनी प्रथम अपिल केले असता अपिलीय अधिकाऱ्यांनी अपिल घेण्यास टाळाटाळ करून होत असलेल्या भ्रष्टाचारावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

जिल्हा परिषद पंचायत समिती ईमारतीचे बांधकाम मागील काळात दर्जेदार करण्यात आली होती. परंतु केवळ निधी लाटण्याच्या उद्देशाने कि काय..? सध्या करण्यात येत असलेले पंचायत समिती हदगांव व हिमायतनगर ईमारत दुरुस्तीचे काम बोगस व निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. सदर काम निकृष्ट होण्यास जि.प. बांधकाम उपविभाग हदगांव, उपअभियंता, शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता हेच जबाबदार असून, यांच्या आशीर्वादाने व कंत्राटदाराच्या संगनमतातूनच हदगांव व हिमायतनगर पं. स. ईमारत दुरुस्तीचे काम बोगस व निकृष्ट केले जात असल्याचा आरोप तक्रारकर्त्यानी केला आहे.

हिमायतनगर व हदगाव पंचायत समिती इमारतीचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून, हे काम तात्काळ थांबवून सदर कामाची देयके गुत्तेदारास अदा करण्यात येऊ नयेत. तसेच या कामाची गुण नियंत्रण पथकामार्फत सखोल चौकशी करुन दोषी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करुन गुत्तेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे. आणि कार्यवाही व चौकशीचा अहवालाची प्रत कळवावी. अन्यथा लोकशाही मार्गाने नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करावे लागेल. याची सर्वस्वी जबाबदारी आपणांवर राहील असा इशाराही तक्रारकर्ते त्रिरत्नकुमार भवरे कामारीकर, संस्थापक अध्यक्ष ,बहुजन टायगर युवा फोर्स, महाराष्ट्रराज्य यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनाच्या प्रति अतुलजी सावे, पालकमंत्री, नांदेड जिल्हा., योगेश कदम साहेब, ग्राम विकास मंत्री, म.रा. मुंबई,आ. बाबुरावजी कदम कोहळीकर, हदगांव- हिमायतनगर विधानसभा मतदार संघ तथा सदस्य, सार्वजनिक उपक्रम समिती, मंत्रालय मुंबई, विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर., जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, नांदेड, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, बांधकाम विभाग नांदेड, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, हिमायतनगर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, हदगाव, संपादक/जिल्हा प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया प्रतिनिधी, नांदेड जिल्हा याना देण्यात आल्या आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments