शिवणी, भोजराज देशमुख। काल शनिवार सायंकाळ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील शिवणी अप्पारावपेठ परिसरात पडलेल्या पावसामुळे अनेक गावांना जोडणाऱ्या पुलावरून पावसाच्या पुराचे पाणी गेल्याने या परिसरातील अनेक गावांचा सकाळच्या दरम्यान संपर्क तुटला होता.
शिवणी,अप्पारावपेठ,इस्लापूरया गावात अनेक महामंडळ व तेलंगणा बसेस जिथल्या तिथे थांबून गेले होते.गावाजवळच्या नालल्या आलेल्या पुरामुळे गावाचे संपर्क तुटले आहे.तर शिवणीसह अप्पारावपेठ परिसरात विविध भागात आलेल्या नाल्याच्या पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतीमध्ये पाणी घुसून शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.तालुका प्रशासनाने याची तात्काळ नोंद घेऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
आगस्ट महिन्यात थांबलेला पाऊस सप्टेंबर महिना लागताच ऍक्टिव्ह मोड वर आला असून.पुढील काही दिवस पाऊस असेच असणार असे हवामान विभागाने सांगितले असून.शिवणी अप्पारावपेठ या परिसरात काल शनिवार सायंकाळी सुरुवात झालेल्या पावसाने हळूहळू गती वाढवल्याने रात्रभर सतत पडलेल्या पावसामुळे या भागातील नाले तुडुंब भरून वाहिले.तर शिवणी निर्मल राज्यरस्तावर शिवणी गावालगत असलेल्या पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने हा राज्य रस्ता बराच वेळ बंद होता.तर अप्पारावपेठ च्या मुख्य पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने अप्परावपेठ वासीयांची सुद्धा तारांबळ उडाली.
तर शिवणी, आपारावपेठसह मलकजाब , मलकजाब तांडा कंचली, पांगरपहाड, आंदबोरी,चिखली, दयाळ धानोरा, दयाल धानोरा तांडा गोंडजेवली,व्यंकटापुर, आम्लापुर, गोंडेमहागाव,तोटंबा,मानसिंग नाईक तांडा,चंद्रुनाईक तांडा,हुडी, कुपटी, तल्हारी,झळकवाडी, यासह परिसरातील अनेक गावे वाडी -तांडे,या काल पासून चालू झालेल्या पावसाने प्रभावित झाले असून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल विभागाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. इस्लापूर रेल्वे ब्रिज खाली पाणी साचल्याने शिवनी आप्पाराव पेठ या मार्गावरील रविवारी दिवसभर संपर्क तुटला होता.
शिवणीच्या आठवडी बाजारपेठेत सर्वत्र पावसाचे पाणी साचल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. शिवणी परिसरातील वडि-तांड्यातील नागरिकांना या सततच्या पावसामुळे शिवणीच्या आठवडी बाजाराला येण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती.तर आज हा रविवारचा बाजार बैलपोळा सणाच्या खरेदीसाठी शेतकरी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला तर सतत च्या पावसामुळे या भागातील काही शेतकऱ्यांना आठवडी बाजारात येऊन खरेदी करता आले नाही.दुपारी तीन वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता.व्यापारी वर्गाने बाजारपेठेत बैल पोळा सणानिमित्त आणलेल्या साहित्याचे विक्री झाली नसल्याने या पावसामुळे व्यापरी वर्गात सुद्धा नाराजी पहावयास मिळाली.तर दुसरीकडे बाजारपेठ सर्वत्र चिखोलच चिखोल झाले होते.या मुळे आठवडी बाजार करणाऱ्या व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.