नवीन नांदेड l राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिडको येथील जिजाऊ सृष्टी येथे नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारंकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या सह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यांच्या सह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिवादन केले.
12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिडको येथील जिजाऊ सृष्टी येथे रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली, सकाळी विधीवत पूजन करण्यात आले.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारंकर, दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, शहरप्रमुख तुलजेश यादव, भाजपा शहर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख,पप्पू गायकवाड, राजु टमान्ना, सामाजिक कार्यकर्ते विलास गजभारे, रवी रायभोळे, यांनी अभिवादन केले,यानंतर मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड यांच्या सह परिसरातील राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिवादन केले.
यावेळी सोपानराव पांडे,साहेबराव गाढे ,अशोक कदम,त्र्यंबक कदम, बालाजी हिवराळे, गोविंदराव जाधव गणेश गायकवाड ,अंकुश सिनगारे, टेकाळे,व्दारकोजी तुडमे,गोविंदराव जाधव,सफारी टेलर,दिलीप कदम, भि.ना.गायकवाड, किशनराव रावणगावकर, भगवानराव ताटे,यांच्या सह सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील व पत्रकार बांधव यांनी अभिवादन केले. सकाळपासून मोठ्या प्रमाणात अभिवादन करण्यासाठी जेष्ठ नागरिक,महिला ,युवक यांनी गर्दी केली होती.