नांदेडराजकीय

Kandhar news : कंधार मध्ये आमदार चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली अनेकांचा पक्षप्रवेश : राष्ट्रवादी मजबूत

कंधार, सचिन मोरे| नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे वातावरण कंधारात तापले असून, काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी न.पा उपाध्यक्ष मन्नान चौधरी, जफर उल्ला खान यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली काल नांदेड येथील साई सुभाष निवास स्थानी जाहीर पक्षप्रवेश केला.

तर दुसऱ्याच दिवशी कंधार भाजपाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा ॲड. जयमंगला औरादकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस देऊबाई गोरे, भाजपा तालुका उपाध्यक्षा सौ कल्पना गीते, कृषी उत्पन्न बाजार समिती कंधारचे संचालक गिरीश मामडे, शैलेश मामडे, नरहरी जिंके यांनी आमदार चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे कंधार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत झाल्याचे चित्र कंधार शहरात निर्माण झाले असून इतर पक्षांना मोठी चपराक बसल्याची चर्चा कंधार शहरातील नागरिका कडून ऐकावयास मिळत आहे.

गेल्या काही दिवसापासून कंधार शहरातील नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून कंधार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगरपरिषद उपाध्यक्ष मन्नान चौधरी यांनी नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी काँग्रेस पक्षाकडे मागितली होती तेथे त्यांचा योग्य सन्मान न झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत आपल्या समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले असून त्याचा परिणाम आगामी निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

याप्रसंगी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष असून या पक्षामध्ये माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कालच माजी उपाध्यक्ष मन्नान भाई चौधरी, जफर उल्ला खान, एमआयएम चे हबू भाई यांच्यासह अनेक मान्यवरांनी जाहीर प्रवेश केला आहे.

तर आज भाजपच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ. जयमंगला औरादकर, गिरीश मामडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रवेश केल्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो त्या सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल. तसेच पक्षात त्यांना सन्मानाची वागणूक देऊन संघटनात्मक जबाबदारी त्यांच्या कडे सोपवली जाईल. असे आमदार चिखलीकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, बाबुराव गिरे, माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, युवा नेते स्वप्निल पाटील लुंगारे, सचिन पाटील चिखलीकर,जफर उल्ला खान, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन किशनराव डफडे, निलेश गौर, असिफ शेख,मधुकर पाटील डांगे, माजी नगरसेवक व्यंकट मामडे, मन्नू भाई, गंगाधर अण्णा कांबळे उत्तमराव पाटील जाधव, चेतन केंद्रे, पिंटूभाऊ कदम, केशवराव पाटील जाधव,राजकुमार केकाटे, खय्यूम भाई, माजी नगरसेवक बालाजी पवार, प्रकाश गोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button